Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM-National Livestock Mission) ही योजना केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात राबविण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत Entrepreneurship Development Facilitation हेल्प डेस्कची स्थापना पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध, पुणे-६७ येथे करण्यात येणार आहे. सदर हेल्प डेस्क अंतर्गत नवीन रिक्त पदांची सेवा उपलब्ध होण्यासाठी खालील नमूद पदांसाठी अर्हताधारक इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन ई- मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : Department of Animal Husbandry started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Offline/Online through Department of Animal Husbandry Official Website.
◾भरती विभाग : पशुसंवर्धन विभाग, पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : पशुसंवर्धन विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 20,000 ते 56,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.
◾पशुसंवर्धन विभागची PDF जाहिरात व अर्ज खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन ई- मेल / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾व्यावसायिक पात्रता :
1] व्हेटर्नरी ग्रॅज्युएट : अ] मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी/ पदव्युत्तर पदवी.
ब] एमएचसीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
क] शासकीय सेवेतील अथवा शासन अंगीकृत उपक्रम / योजना/ प्रकल्प इ. मध्ये काम केल्याचा अनुभव असल्यास अथवा सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य)
2] डाटा एन्ट्री ऑपरेटर : अ] किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण, पदवीधर असल्यास प्राधान्य.
ब] एमएचसीआयटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
क] इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण.
◾एकूण पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (All Maharashtra)
◾सदर नेमणूक ११ महिन्यांसाठी कंत्राटी स्वरूपाची असेल आणि याबाबत भविष्यात कोणत्याही शासकीय नोकरीचा दावा करता येणार नाही.
◾अर्जदाराने अर्जासोबत तीन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडावेत.
◾अर्जावर पासपोर्ट फोटो चिकटवल्यानंतर सही करताना अर्धी सही कागदावर व अर्धी सही फोटोवर उमटेल अशा पद्धतीने सही करावी.
◾अर्जासोबत शैक्षणिक अर्हता धारण करत असल्याबाबत सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडण्यात याव्यात.
◾अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला जोडण्यात यावा.
◾अर्जासोबत ओळखपत्राचा पुरावा (आधार कार्ड / मतदाता कार्ड / ड्रायव्हींग लायसन्स / पॅनकार्ड इ. यापैकी एक) जोडावा
◾अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर दि. २०/०६/२०२४ पर्यंत nim.sia.maha@gmail.com या मेलवर अथवा आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेज समोर, औंध, पुणे ४११०६७ या पत्त्यावर स्पीड पोस्ट, कुरियर मार्गाने अथवा प्रत्यक्ष पाठवावा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध, पुणे-६७
◾ई-मेल पत्ता : nim.sia.maha@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.