पाटबंधारे विभाग मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध | आजच अर्ज दाखल करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
वेबसाईटयेथे क्लीक करा
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

परत नोकरी शोधताय? पाटबंधारे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळामार्फत २०२५ मध्ये काही निवडक पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ज्यांना आपल्या सेवानिवृत्ती नंतर अनुभवाच्या जोरावर पुन्हा कार्यरत होण्याची संधी हवी आहे, अशा अभियंत्यांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची आहे.

पदाची माहिती: या भरतीत सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता तसेच सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) अशा पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण ०४ रिक्त पदे उपलब्ध असून, ही सर्व पदे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी राखीव आहेत.
नोकरीचे ठिकाण: उमेदवारांची नेमणूक धुळे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प मंडळात होणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अनुभव असलेले अभियंते या संधीसाठी अधिक योग्य ठरू शकतात.
अर्ज करण्याची प्रक्रिया: या भरतीसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या नमुन्यानुसार तयार करून आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवावा:

अर्ज करण्यासाठी पत्ता: अधीक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, साक्री रोड, धुळे – ४२४००१.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: अर्ज २९ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत संबंधित कार्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
टीप:
1) ही भरती केवळ सेवानिवृत्त अभियंत्यांसाठी असून, सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये.
2) अर्ज सादर करताना आवश्यकतेनुसार सेवा निवृत्तीचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी जोडावीत.
3) अर्ज पाठवताना लिफाफ्यावर स्पष्टपणे “सेवानिवृत्त अभियंता पदासाठी अर्ज” अशी नोंद करावी.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo