Patbandhare Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई, शासन निर्णय अनुसार खालील संवर्गातील फक्त जलसंपदा विभागातील जिल्हयांतर्गत क्षेत्रियस्तरावरील सिंचन व्यवस्थापन व बांधकामाधीन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पाटबंधारे विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.
Patbandhare Vibhag Bharti 2024 : Irrigation Department Kolhapur invites applications from interested and eligible candidates. There is good opportunity to get job in irrigation department. Recruitment advertisement has been published by Superintending Engineer, Irrigation Department, Government of Maharashtra.
◾भरती विभाग : पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली PDF जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पाटबंधारे विभाग भरतीची पूर्ण pdf जाहिरात, अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 64 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
◾भरती कालावधी : नियुक्ती एका वेळी जास्तीत जास्त १ (एक) वर्षासाठी देण्यात येईल.
◾पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
◾व्यावसायिक पात्रता :
1] जलसंपदा विभागातुन खालील पदावरुन सेवानिवृत्त असलेलं अधिकारी/ कर्मचारी असावा. सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / सहा अभि श्रेणी// शाखा अभियंता/ उपविभागीय अभियंता / अधिकारी
2] अर्जदारांकडे स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असावी.
3] अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचा-याना करार पध्दतीने करावयाच्या कनिष्ठ अभियंता या सवंगांतील पदाचे विवक्षीत कामाचा किमानः तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 012 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : कोल्हापूर. (JOBS IN KOLHAPUR)
◾अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावीत सेवेसावी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
◾अर्ज करणा-या सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचा-याविरुध्द कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी व न्यायालयीन प्रकरण प्रलंबीत नसावे याबाबत अर्जदारांनी ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले आहेत, त्या संबंधीत कार्यालयाकडून तसे प्रमाणपत्र घेऊन अर्जासोबत सादर करावे.
◾करारपध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधीतास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाबाबत किंवा सामावून घेण्याबाबत वा नियमीत सेवेचा इतर कोणतेही लाभ तसेच इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्याचा अधिकार नसेल हे स्विकृत असले बाचात अर्जदाराने रु. १००/- च्या स्टॅम्पवर अर्जासोबत बंधपत्र/हमी पत्र देणे अनिवार्य आहे.
◾करार पध्दतीने नियुक्त झालेल्या उमेदवाराचे घोषित कार्यक्षेत्र हेच मुख्यालय राहील. तथापि आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना त्यांच्या निवृत्ती वेळच्या वेतनमानास अनुसरुन प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहील.
◾करार पध्दतीने नियुक्त करण्यांत आलेल्या व्यक्तीने त्याच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेले कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील, त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील.
◾करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अर्जदाराने नियुक्तीच्या ठिकाणी नियुक्ती आदेश निर्गमीत झालेल्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत रुजू होणे १५ बंधनकारक राहील अन्यथा सदर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.
◾सदर कामासाठी करार पध्दतीने देण्यात येणारी नियुक्ती एका वेळी जास्तीत जास्त १ (एक) वर्षासाठी देण्यात येईल. सदर नेमणूक १ वर्षाच्या पुढे वाढविण्याची आवश्यकता भासल्यास नियुक्ती अधिकारी तसा निर्णय घेऊ शकतात.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर- ४१६००३.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.