‘पाटबंधारे विभाग’ व्दारे नवीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज करा.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव अंतर्गत नवीन पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कायदे / विधी सल्लागार हे 01 पद भरले जात आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नोकरी ठिकाण हे जळगाव (Jobs in Jalgaon) हे असणार आहे. या भरतीसाठी 70 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. नियम व अटी : करारपध्दतीने नियुक्ती देण्यांत आल्यामुळे संबंधीतास शासनाच्या कोणत्याही विभागात/संवर्गात सेवा समावेशनाबाबत किंवा सामावून घेण्याबाबत वा नियमित सेवेचा इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार/हक्क नसेल याबाबत अर्जदाराने रु.१००/- च्या स्टॅम्पवर प्रतिज्ञालेख देणे बंधनकारक राहील. अर्ज करणा-या सेवानिवृत्त न्यायाधीश यांनी त्यांची शारीरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक अधिका-याचे मुळ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकाराक राहील.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास नेमूणक दिलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधीत व्यक्तीची राहील व तसे बंधपत्र / हमीपत्र अटी व शर्ती संबधीत उमेदवाराला मान्य आहेत ह्याबाबतचे उमेदवाराने रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर बंधपत्र देणे बंधनकारक राहील. अर्ज करणा-या सेवानिवृत्त न्यायाधीश विरुध्द कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी व न्यायालयीन प्रकरण चालु अथवा प्रलंबीत नसावे याबाबत अर्जदारांनी ज्या कार्यालयातुन सेवानिवृत्त झाले आहे, त्या संबंधीत कार्यालयाकडुन तसे प्रमाणपत्र देणे बंधनकारक राहील. नियुक्ती प्राधिकारी यांना कोणत्याही वेळी करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.

सदर सेवानिवृत्त न्यायाधीश त्यांच्यावर सोपविलेल्या/पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही कामात गुंतलेला नसावा. अशा अधिकारी यांनी Conflict of interest जाहीर करणे आवश्यक राहील. करार पध्दतीने नियुक्त झालेल्या सेवानिवृत्त न्यायाधीश यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळच्या वेतनमानास अनुसरुन प्रवास भत्ता व दैनिंक भत्ता अनुज्ञेय राहील.

ईच्छुक अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज शैक्षणिक पात्रता/अनुभव व इ. पुरक कागदपत्रासह दिलेल्या पत्त्यावर दि. १०/०१/२०२४ (सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत) प्राप्त होईल याप्रमाणे टपालाव्दारे किंवा प्रत्यक्ष सादर करावीत. अर्ज सादर करण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.


error: Content is protected !!