10वी पास उमेदवारांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती सुरू! | PDF जाहिरात येथे पहा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

10वी पास असाल आणि काम शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी चांगली संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे ब्रिडींग चेकर्स ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 56 पदे भरली जाणार आहेत. वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी  ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. 03 जुलै 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जुलै 2024 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: वैद्यकीय विभाग, दुसरा मजला आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- ४११ ०१८.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नियम व अटी : सदरची पदे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राहतील, सदर पदांचा पिंपरी चिंचवड म.न.पा. आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. तसेच सदर पदाचे काम केलेल्या कोणाचाही अनुभव शासकीय नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच सदर पदाचा कोणत्याही परिस्थितीमध्ये आ. कर्मचारी (पु) या पदाच्या भरतीसाठी आवश्यक असणा-या ९० दिवसांच्या कामाकजाचा अनुभव म्हणुन ग्राहय धरला जाणार नाही किंवा या बाबत उमेदवाराने केलेला कोणताही दावा मान्य केला जाणार नाही. सदरची पदे पुर्णपणे केवळ राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची असल्याने अर्जदारास कायमपदी नियुक्तीचा हक्क सांगता येणार नाही. ज्या दिवशी सदर पदांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशीशिवाय त्यांची सेवा समाप्त केली जाईल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार मा. आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी राखुन ठेवलेले आहेत. प्रस्तुतचे जाहिरातीमधील पदाकरिता करावयाच्या अर्जाचा नमुना जाहिराती सोबत महापालिका संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
१६) सदर जाहिरातीच्या अनुषंगाने गुणानुक्रम यादी तसेच अंतिम निवड यादी, नेमणूक आदेश, महापालिकेच्या संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर प्रसिध्द केले जातील. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.


error: Content is protected !!