पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025 | नवीन पदांची भरती सुरू! | Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत “पवित्र प्रणाली” अंतर्गत प्राथमिक शिक्षक पदांची भरती (टप्पा-२) जाहीर करण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रिया मुलाखत न घेता थेट निवड प्रक्रियेद्वारे होणार आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2025 : The Education Department of Pimpri Chinchwad Municipal Corporation has announced the recruitment of Primary Teacher posts (Phase-2) under the "Pavitra Pranali". The recruitment process will be done through direct selection process without interview. For this, applications are being invited online from healthy, interested and eligible candidates who fulfill the following eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
एकूण पदे : 052 जागा.
पदाचे नाव : शिक्षक.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 1) Under Graduate Teacher (UGT) – इयत्ता 1 ते 5 : 16,000 रु. प्रतिमाह.
2) Graduate Teacher (GT) – इयत्ता 6 ते 8 : 16,000 रु.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 अधिकृत
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 ऑनलाईन
अर्ज
येथे क्लीक करा

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन Online पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष.
भरती कालावधी : जाहिरातीत भरतीचा कालावधी स्पष्टपणे नमूद केलेला नाही.
अर्ज सुरू : ०१ मे २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
इतर आवश्यक पात्रता :
▪️1 ली ते इ 5 वी व इ 6 वी ते इ 8 वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
▪️6 वी ते इ. 8 वी या गटातली इतिहास/भूगोल / सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिकशास्त्र विषय घेऊन TET-Paper-2/CTET Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️6 वी ते इ 8 वी या गटातील विज्ञान/गणित/गणित-विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️6 वी ते इ. 8 वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यांपैकी कोणताही विषय घेऊन TET Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️1ली ते 8 वी / इ. 9 वी ते 12 वी / अध्यापक विद्यालय या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 052 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे.
◾अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली (https://tait2022.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे, असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
◾इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील.
◾शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादी साठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये “उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना” या शीर्षाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!