
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अॅन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मधील खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. या भरती मध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ -पूर्णवेळ, स्टाफ नर्स, ए.एन.एम ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 102 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण आणि ANM, 12वी जीएनएम/बीएस्सी नर्सिंगसह उत्तीर्ण, एमडी बालरोग/डीएनबी, एमबीबीएस उत्तीर्ण पाहिजे.
इच्छुक उमेदवारांनी दिनांक ०७/०३/२०२५ ते १९/०३/२०२५ पर्यंत इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, चौथा मजला, शिवाजी नगर, पुणे ४११००५ येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. तदनंतर अर्जाची छाननी करून उमेदवारांची पात्र / अपात्र इत्यादीबाबत सविस्तर माहिती वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर https://www.pmc.gov.in प्रसिद्ध करण्यात येईल. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.