pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
पुणे महानगरपालिका अंतर्गत समाज विकास विभागाकडील प्रशिक्षण केंद्रातील खालील अस्थायी पदांवर ०६ महिने मुदतीकरीता एकवट मानधन तत्वावर तसेच बॅच निहाय सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक, वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक, ब्युटीपार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक MS-CIT, TALLY, 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक. ही पदे भरली जात आहेत.
एकूण 029 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण, बीसीए/एमसीए/बीसीएस/एमसीएस /एमसीएम/आयटी, बीई, बीए / एम.ए., आय.टी.आय / डिप्लोमा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन दरमहा रु. 6,000/- ते रु. 9,750/- पर्यंत दिले जाणार आहे. १८ ते ५८ वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही पात्र असाल तर ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 24 डिसेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 जानेवारी 2025 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, पुणे (पोस्टाने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत).
नियम व अटी : टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उपरोक्त कागदपत्रांच्या मूळ प्रती निवड झालेल्या उमेदवारांनी रूजू होताना दाखविणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र सोबत कागदपत्रे साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे. अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली नसल्यास तसेच अर्जासोबत उपरोक्त नमूद दाखल्याच्या प्रती जोडलेल्या नसल्यास सदरचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जासोबत दिलेली माहिती व मूळ कागदपत्रांत काही दोष आढळल्यास अशा नेमणूका बाद करण्यात येतील. निवड झालेल्या उमदेवारांना विहीत नमुन्यात करारनामा करून फक्त ०६ महिन्यांकरीता नेमणूक दिली जाईल. त्यानंतर करार संपल्यानंतर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. त्याकरिता पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार नाही. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
निवड झालेल्या उमेदवारास स्वखर्चाने करार करून द्यावा लागेल. निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार मा. अति. महापालिका आयुक्त (इ.), पुणे महानगरपालिका, पुणे यांनी राखून ठेवले आहेत. सदर नियुक्त्या मानधन तत्वावर सहा महिने मुदतीकरीता होणार असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना मनपाच्या आस्थापनेवरील कोणत्याही पदावर कायमस्वरूपी नियुक्तीकरीता हक्क सांगता येणार नाही. तसेच मनपा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेले कोणतेही लाभ मिळण्यास ते पात्र ठरणार नाहीत. निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारक करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पुर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रुजू होण्यापूर्वी एका महिन्याचे मानधन अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल. त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात पहा.