PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
पुणे महानगरपालिका, इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी मध्ये नवीन जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये योग प्रशिक्षक ही तब्बल 0179 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण व योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन: रु. २५०/- प्रत्येक योग सत्र या प्रमाणे देय राहील. या भरतीसाठी १८ ते ४५ वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती उमेदवार ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
नियम व अटी : सदर पदासाठी सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही. मुलाखती दरम्यान उमेदवारास योगाचे प्रात्यक्षिक करावे लागेल, त्यानुसार मूल्यांकन करण्यात येईल. निवड / नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार मा. अति. आयुक्त (ज), पुणे महानगरपालिका यांनी राखून ठेवले आहेत. दि. २४/१२/२०२४ रोजी, दुपारी ०५:०० वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांनी आपली वरीलप्रमाणे कागदपत्रे इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली बेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५ येथील कार्यालयामध्ये सादर करावयाची आहेत. मुलाखतीची तारिख, वेळ व ठिकाण आपणांस दूरध्वनीद्वारे अथवा ईमेलद्वारे कळविण्यात येईल. उमेदवाराने स्वतः स्वखर्चाने मुलाखतीस हजर रहावे.