पोलीस भरती 2024 : मोठी अपडेट! Police Bharti 2024 Big Update

Police Bharti 2024 : राज्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील विविध घटकांत होत असलेल्या हजारो पदांच्या भरतीकरिता ३० मार्चपर्यंत अर्ज नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया रखडणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लेखी व मैदानी परीक्षेचा निर्णय जूनअखेरीस होणार असल्याचे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीनंतर भरतीचा पुढील टप्पा असल्याने लेखी परीक्षेसह मैदानी चाचणीच्या तयारीकरिता उमेदवारांना वाढीव अवधी मिळाला आहे. त्यामुळे उमेदवारांचा अभ्यास व मैदानी चाचणी सराव करण्यास वेळ मिळणार आहे. पोलीस भरती 2024 संदर्भात महत्वाची माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Police Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यात तब्बल 18,000+ पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली असून ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. 5 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले असून 30 मार्च 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. पोलीस भरती 2024 संदर्भात मोठी अपडेट खाली क्लीक करून पहा.
पोलीस भरती 2024
मोठी अपडेट
पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

यावेळी राज्यात शहर व ग्रामीण पोलीस दलात भरती प्रक्रिया चालू आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारणे चालू आहे. दोन्ही पोलिस दलांतील भरती प्रक्रियेसंदर्भांतील कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार ३० मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज नोंदणी करता येईल. मात्र, आचारसंहिता व लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत. परिणामी, पोलिस भरतीचे पुढील टप्पे राबविणे शक्य होणार नाही. त्यामुळे अद्याप पुढील नियोजन पोलिस दलाने स्पष्ट केलेले नाही. जून महिन्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी भरतीचे पुढील टप्पे जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात उमेदवारांना सविस्तर कळविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

error: Content is protected !!