
पोलीस भरती 2024 महत्वाच्या सूचना | येथे क्लीक करा |
सर्व जाहिराती | येथे क्लीक करा |
SRPF आरक्षण नुसार जागा | येथे क्लीक करा |
जिल्ह्यानुसार जागा | येथे क्लीक करा |
मुंबई पोलीस 2024 भरती जाहिराती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
पोलीस भरती 2024 ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बॅण्डस्मन / राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गात दिनांक ३१/१२/२०२३ अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणना करुन जाहीर करण्यात आलेली आहे. सदरची रिक्त पदे सामाजिक आरक्षणांतर्गत मागील अनुशेष व बिंदुनामावलीनुसार निश्चित करण्यात आलेली आहेत. पोलीस भरती 2024 च्या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बॅण्डस्मन / राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गात भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्ती झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र पोलीस नियमावली, १९९९ व पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व घटक प्रमुखांनी वेळोवेळी विहित केलेली कर्तव्ये पार पाडावी लागतील.