Police Patil Bharti 2023 : तुम्ही जर तुमच्या आसपास काम शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तसेच समाजसेवा करण्याचीपण संधी उपलब्ध झाली आहे. पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पोलीस पाटील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास आहे. त्यामुळे लगेच आजचं ऑनलाईन अर्ज करा. सविस्तर माहिती व जाहिरात खाली दिली आहे.
◾ पोलीस पाटील भरती 2023 : महत्वाची माहिती :
1) शैक्षणिक पात्रता : 10वी पास.
2) अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
3)अर्जदाराचे वय दिनांक 1 मार्च 2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे.
4) पोलिस पाटील पदाकरीता वयोमर्यादा शिथीलक्षम नाही.
5) अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
6) महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.
7) मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध ठेवावे.
◾भरतीसाठी प्रमाणपत्र आवश्यक :
1)इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब. क. इ प्रवर्गातील अर्जदार यांना सन 2022-23 कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
2) इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज- ब.क. ड प्रवर्गातील महिला पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांना सन 2022-23 कालावधीकरीता वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र आवश्यक राहील. (पोलीस पाटील भरती 2023)
◾ निवड प्रक्रिया व पद्धति :
१) प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अर्जदारांस शैक्षणिक पात्रता व इतर संबंधीत मुळ प्रमाणपत्र तपासणीसाठी मुलाखतीच्या दिवशी उपलब्ध करुन दयावी लागतील. अन्यथा तोंडी परिक्षा अंतिम निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही.
२) लेखी परिक्षा, तोंडी परिक्षा, कागदपत्रे छाननी इत्यादी करीता प्रवेशपत्र, कार्यक्रम, विविध सुचना या केवळ संकेत स्थळाला भरती प्रक्रियेची माहिती / कार्यक्रमाबाबत अदयावत व सजग राहण्याची प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील.
३) लेखी परिक्षेअंती मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांचे जाहीरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मुळ कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता अंतरीम स्वरुपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या अर्जदाराची जाहीरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिध्द होईल अशाच अर्जदाराचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टण्याकरीता करण्यात येईल. जाहिरातीत नमुद केलेली संपूर्ण अर्हता ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती व मुळ कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास अर्जदाराची उमेदवारी भरतीच्या कुठल्याही टप्यावर रह होवू शकेल.
४)अर्जदार शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वैद्यकिय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील व अर्जदाराची पात्रता वैद्यकिय तपासणी अंतीच निश्चित करण्यात येईल.
५) अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असल्याबाबतचे संबंधीत पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहिल.
६) अर्जदारांचे कोणत्याही राजकिय पक्षाशी संबंध नसावा. अर्जदार हा नेमणुकीच्या गावी स्थानिक स्वरुपाचा उद्योग करणारा नसावा. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी संपूर्ण वेळ नोकरी वा धंदा करणारा नसावा. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य नसावा. तसेच खाजगी किंवा निमसरकारी संस्थेचा सदस्य नसावा, अथवा पुर्णवेळ नोकरी करणारा नसावा, याबाबतचे रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
७)पोलिस पाटील पदांवरील नियुक्तीकरीता मृत/सेवानिवृत्त पोलिस पाटलांच्या वारसानांनी अर्ज केल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल. परंतु याचा अर्थ एकाच स्थानासाठी (Position) पोलिस पाटलांच्या वारसांसह दोन किंवा अधिक अर्जदारांना समान गुण मिळाल्यास पोलिस पाटलांच्या वारसानांची निवड करण्यात प्राधान्य देण्यात येईल. परंतु तो महाराष्ट्र ग्रामपोलिस पाटील ( सेवा प्रवेश, पगार भत्ते आणि सेवेच्या इतर शर्ती) आदेश 1968 व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणानुसार त्या गावांसाठी ठरविण्यात आलेल्या सामाजिक समांतर आरक्षणाचा असला पाहिजे.
जाहिरात | Click here |
ऑनलाईन अर्ज | Click here |
टेलिग्राम ग्रुप | Click here |
महत्वाची माहिती :
८) अर्जदार संबंधीत गावाचा स्थानिक व कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
९) अर्जदार कोणत्याही एकाच गावाचा स्थानिक / कायमचा रहिवासी असू शकतो. सबब अर्जदाराने अशाच एका गावात अर्ज करावा. एकापेक्षा अधिक गावातून केलेले सर्व अर्ज बाद करण्यात येतील. १०) प्रत्येक गावात केवळ एक पद उपलब्ध आहे व ते शासकिय निकषानुसार आरक्षित करण्यात आलेले आहे. अर्ज करतांना अर्जदाराने आरक्षण तपासून अर्ज करावा. (आरक्षण व्यतिरीक्त असलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नये.)
११) भंडारा उपविभागातील रिक्त पदांच्या सर्व गावांसाठी एकाच दिवशी व वेळी परिक्षा घेण्यात येईल. १२) संपूर्ण भरती प्रक्रीया गाव निहाय होणार असून कोणत्याही दोन गावाच्या प्रक्रियेचा एकमेकांशी संबंध नसेल. (Police Patil Bharti 2023)
(१३) पोलीस पाटील हे पद वर्गीकृत नाही.
(१४) पोलीस पाटलांना क्षेत्रिय स्तरावर (Field work) काम करावे लागते. त्यामुळे सदर पद धारण करणारी व्यक्ती ही शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना अपंगासाठीचे आरक्षण लागू करण्यात आलेले नाही. १५) पोलीस पाटील हे पद एका गावात एकच असते त्यामुळे हे पद एकाकी असल्याने त्यांना प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, खेळाडु यासारखी समांतर आरक्षणे लागु होत नाहीत.
१६) इमाव, विमाप्र, विजाअ, भज ब, भज क, भजड प्रवर्गातील उमेदवाराने दिनांक- ३०/०३/२०२३ पर्यंत किंवा त्यानंतर वैध असलेले नॉन क्रिमीलेअरचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.
१७) शासन महिला व बालविकास विभागाकडील निर्णय क्र.८२/२००१/मसे आ/२०००/प्र.क्र. ४१२/का-२ दि. २५/०५/२००१ आणि तद्नंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा-अ व भज-ब,क,ड प्रवर्गातील महिला आरक्षाणाअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिला अर्जदारांनी सन २०२२-२३ या कालावधी करीता दि.३०/०३/२०२३ पर्यत वैध असलेले उन्नत आणि प्रगत व्यकती व गट (क्रीमिलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले मुळ प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
(१८) सामान्य प्रशासन विभागाकडील शासन अधिसूचना क्र. एसआरव्ही-२०००/प्र.क्र.१७/२००० दिनांक 28/03/2005 व क्र. एसआरव्ही-2000/प्र.क्र.17/2000 दिनांक 01/07/2005 तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम 2005 अन्वये दिनांक 28/03/2005 रोजी हयात असलेले व त्यानंतर जन्माला आलेल्या अपत्यांच्या संख्येबाबत लहान कुटुंब असल्याचे विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच अविवाहीत असणाऱ्या उमेदवारांनेही विहीत (अ)) नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
१९) लेखी परिक्षेत पात्र ठरलेल्या अर्जदारास पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 20 गुणांच्या तोंडी (मुलाखत) परिक्षेस अनुपस्थित राहणारा अर्जदार अंतीम निवडीस अपात्र ठरेल.
उमेदवाराला मुलाखतीत शुन्य गुण मिळाले असले तरी लेखी परिक्षेतील गुणांच्या आधारे तो जर गुणवत्ता यादीत येत असेल तर अशा अर्जदार पोलीस पाटील पदांवरील निवडीकरीता पात्र राहील.
२०) समान गुण मिळाल्यास अंतिम निवडः शासन निर्णय क्र. डीव्हीपी-1113/1767/प्र.क्र.592/पोल-8, दिनांक 22/08/2014 अन्वये गुणवत्ता यादीतील एकाच स्थानासाठी (Position) दोन किंवा अधिक अर्जदाराला समान गुण मिळाल्यास प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतीम निवड केली जाईल. (अ) पोलीस पाटलांचे वारस, त्यानंतर ब) अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्च शैक्षणिक अर्हता धारण करणारे अर्जदार, त्यानंतर (क) माजी सैनिक असलेले अर्जदार, त्यानंतर ड) वयाने जेष्ठ असलेले अर्जदार पोलीस पाटलांच्या वारसामध्ये पती, पत्नी आणि दोन मुले यांचा समावेश, त्या व्यतिरीक्त अन्य कोणत्याही नातेवाईकांचा वारस म्हणून विचार करता येणार नाही.
(२१) याशिवाय महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 व त्यास संलग्न असलेले नियम आणि वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेले आदेश शासन निर्णय, परिपत्रकांतील नेमणुकीसाठी इतर प्रचलित असलेल्या अटी सुध्दा बंधनकारक असतील.
२२) जाहिरनामा प्रसिध्द होण्यापूर्वी ज्या उमेदवारांनी पोलिस पाटील पदांसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज केले असतील ते सर्व अर्ज रद्द झाले आहेत, असे समजण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज कसा करावा : Police Patil Bharti 2023
१) प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाही. उमदेवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदविलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक चुकीचा / अपूर्ण तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर्ड (DND) असल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रीयेदरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सुचना संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत उमेदवारांची राहील. तसेच ई-मेल आयडी व मोबाईल वहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना उपविभागीय अधिकारी भंडारा हे जबाबदार असणार नाही. सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रीयेदरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रीयेच्या माहिती बाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी संबंधीत उमेदवारांची राहील.
२)पात्र उमेदवाराला वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन अर्ज www.sdobhnpolicepatil.in या वेबसाईटद्वारे सादर करणे आवश्यक राहील. ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंत संकेतस्थळावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल.
३)उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना, शैक्षणिक कागदपत्रे अन्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवारांची राहील व याबाबत उमेदवारांस कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही. तसेच ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही.
४)ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करतांना उमेदवारांजवळ स्वतःचा ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. पुढील सर्व पत्रव्यवहार उमेदवाराने ऑनलाईन अर्जात नोंदविलेल्या ई-मेल आयडीद्वारे होणार असल्याने अचुक ई-मेल आयडी नोंदविणे आवश्यक आहे व याबाबत उमेदवारास कोणतीही तक्रार करता येणार नाही. तसेच स्वतःचा अद्यावत विहीत पासपोर्ट साईज फोटो व सही स्कॅन करुन www.sdobhnpolicepatil.in या संकेतस्थळावरील सुचनेनुसार अपलोड करणे अनिवार्य आहे. अपलोड करतांना फोटोची व सहीची प्रत्येकी साईज 35 केबीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
५)उमेदवारांची लेखी परीक्षा ही त्यांनी ऑलाईन अर्जात नमुद केलेल्या पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्वतपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाही. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतरीम यादी प्रसिध्द करुन मुळ कागदपत्रांच्या पुर्ण छाननीनंतरच उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे अधिकार पोलीस पाटील पदभरती निवड समिती कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत व याबाबत उमेदवारास कोणतीही तक्रार करता येणार नाही.
६)ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना www.sdobhnpolicepatil.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
७) उमेदवारानं ऑनलाईन आवेदन अर्ज भरतांना जाहिरात डाऊनलोड करुन काळजीपूर्वक वाचावी. ८). अर्जदाराने फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करुन अपलोड करावे. फोटो 35 केबीपेक्षा कमी असावा आणि स्वाक्षरी 35 केबीपेक्षा कमी असावी.
९)ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपुर्ण भरुन भरलेल्या उमेदवाराची स्थिती / परिक्षा प्रवेशपत्र / वेळापत्रक / परिक्षाकेंद्र / बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती वर दिलेल्या वेबसाईटवर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रीये दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रीयेच्या माहितीबाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
१०. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर www.sdobhnpolicepatil.in या संकेतस्थळावरुन परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. कोणत्याही उमेदवारास पोष्टाद्वारे प्रवेशपत्र पाठविले जाणार नाही व प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही. ११. लेखी परीक्षा झाल्यावर दोन तासाने आदर्श उत्तरपत्रिका प्रकाशित केली जाईल. (Police Patil Bharti 2023) लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणताही प्रश्न चुकीचा आढळल्यास लेखी परिक्षेच्या नंतरच्या दिवशी दुपारी १२.०० वाजेपर्यंत त्याबाबत लेखी आक्षेप निवड समिती भंडारा यांचेकडे नोंदवावे लागेल. याबाबत उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष पोलीस पाटील निवड समिती भंडारा यांचा निर्णय अंतिम राहील… १२. सदर परीक्षा ही निःशुल्क असणार आहे. अपात्र उमेदवारांना हरकती दि. ०१/०४/२०२३ दुपारी ३.०० पर्यंत कार्यालयीन वेळेवर घेता येईल. त्यांनतर आक्षेप / हरकतीचा विचार केला जाणार नाही. प्रवेशपत्र पोष्टाने पाठविले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. (पोलीस पाटील भरती 2023) उमेदवाराने स्वतः विहित वेळेत आपले प्रवेशपत्र (Hall ticket ) डाऊनलोड करुन प्रिंट करावी.