Prerana Co-Operative Bank Bharti 2025 : संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व ₹ ७४२ कोटी व्यवसाय असलेल्या तसेच संपूर्ण Core Banking Solution व विविध डिजीटल चॅनेल वापरत असलेल्या बँकेत आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या पदवीधारकांकडून असिस्टंट क्लार्क पदाकरीता ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Prerana Co-Operative Bank Bharti 2025 : Applications are invited online for the post of Assistant Clerk from graduates who wish to build their career in a bank that has a business of ₹ 742 crore and operates across the entire state of Maharashtra and uses a complete Core Banking Solution and various digital channels.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : सहाय्यक लिपिक.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक मानधन / वेतन : –
◾PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत
◾वयोमर्यादा : 22 ते 35 वर्षे दरम्यान वय असलेले उमेदवार.
◾परीक्षा शुल्क : एकूण 708 रूपये.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2) MS-CIT/ समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.
◾एकूण पदे : 020 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Bank jobs in Pune)
◾उमेदवाराने प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा.
◾कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन यांचे अधिकृत संकेतस्थळ www.kopbankasso.co.in या वेबसाईटवर जावून ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरावयाचे आहे.
◾परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेणेत येईल. परीक्षा १०० मार्काची व बहुपर्यायी असणार आहे. पासिंगची गुणवत्ता यादी (कट ऑफ) ठरवणेत येईल व त्याप्रमाणे मुलाखतीस बोलवताना गुणनुक्रमे बोलविले जाईल. परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम साधारण IIBF च्या धरतीवर आधारीत आहे. परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडला आहे.
◾तोंडी मुलाखतीचे आयोजन प्रेरणा को-ऑप बँक लि. यांचे मार्फत केले जाईल. ऑफलाईन परीक्षेतील मेरीटप्रमाणे तोंडी मुलाखतीसाठी बोलविले जाईल.
◾देय पगाराबाबतची माहिती उमेदवारांना तोंडी मुलाखतीचे वेळी बँकेकडून दिली जाईल.
◾लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी असोसिएशन व बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
◾मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल. याबाबतचे सर्व अधिकार प्रेरणा को-ऑप बँक्रेच्या संचालक मंडळाकडे राहतील.
◾भरती प्रक्रिये संदर्भातील पुढील अपडेट मिळविणेसाठी वेळोवेळी बँकेच्या व असोसिएशनध्या वेबसाईटला भेट द्या.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 19 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत फक्त अर्ज करता येईल.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.