PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2024 करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे. या भरती मध्ये एकूण 615 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी फक्त पोलीस विभागांतील रुजू असलेले कर्मचारीच अर्ज करू शकणार आहेत. सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई हे अर्ज करू शकतील. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
वरती दिलेल्या जाहिरातमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील उमेदवारांकरीता माहिती विभागातील सूचना अंतर्गत सर्वसाधारण सूचना तसेच परीक्षा या सदराखालील परीक्षा योजना” विभागातील पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती जाहिरात अधिकृत समजण्यात येईल. प्रस्तुत्त जाहिरात आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 7 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.