पुणे महानगरपालिका मध्ये नवीन 0682 पदांची भरती! | पात्रता – 10वी, 12वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण | Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविणेत येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन रिक्त पदांसाठी युवकांना अर्ज सादर करता येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना करीता रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pune Mahanagarpalika Bharti 2024 : Under the Chief Minister's Youth Training Scheme (CMYKPY), youth can submit applications for new vacancies in the Pune Municipal Corporation. Online applications are invited from interested and eligible candidates.

भरती विभाग : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आलेली आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : 0682 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, कॉम्पुटर ऑपरेटर, माळी, ट्रॅफिक वॉर्डन, लिपिक, टंकलेखक व इतर पदे भरली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज शुल्क : फी नाही.
भरती कालावधी : ६ महिने प्रशिक्षण कालावधीसाठी ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️संगणक विभाग : आयटीआय (कॉम्प्युटर ऑपरेटर अण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट)
▪️शीट मेटल वर्क : आयटीआय (पंप ऑपरेटर कम मेकॅनिक)
▪️मेकॅनिक मशीन टूल्स : आयटीआय (मेकॅनिक मशीन टूल्स अण्ड मेंटेनन्स)
▪️मोटार वाहन विभाग (टायर) : १२ वी पास
▪️टंकलेखन : १२ वी पास + टंकलेखन
▪️सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक : आय.टी.आय. (सर्वेअर)
▪️उद्यान विभाग : १२ वी उत्तीर्ण व शासन मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची कृषी पदविका उत्तीर्ण.
▪️माळी : १० वी उत्तीर्ण व शासन मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्राची माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
▪️ट्रॅफिक वॉर्डन : एच.एस.सी. व तत्सम.
▪️लिपिक टंकलेखक : पदवीधर
▪️डाटा ऑपरेटर : १२ वी पास.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे व पोर्टलवरील पदांसाठी Online Apply करणे आवश्यक आहे.
◾प्रशिक्षण कालावधीत मिळणारे विद्यावेतन १२ वी उत्तीर्ण ६०००/- आय.टी.आय. पदविका-८००० पदवीधर पदव्युतर १००००/- या प्रमाणे सदरच्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत DBT द्वारे प्रशिक्षणाच्या भेट बैंक खात्यात जमा करण्यात येईल.
◾इच्छुक प्रशिक्षणार्थीसाठी अटी खालील प्रमाणे आहेत उमेदवाराचे किमान उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास/ आयटीआय/पदविका/पदवी/पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण बालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
◾उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
संपर्क : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे-०२०-२६१३३६०६/ पुणे महानगरपालिका ०२०-२५५०१४८३
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!