Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिका, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) मध्ये 0179 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. पुणे महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आरोग्य अधिकारी तथा सचिव आय. एच. एफ. डब्ल्यू, सोसायटी व पुणे महानरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Pune Mahanagarpalika Bharti 2024 : Pune Municipal Corporation, Integrated Health and Family Welfare Society for Pune Municipal Corporation will be selecting eligible candidates to fill 0179 vacancies in the National Urban Health Mission (NUHM) under the Pune Municipal Corporation.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : पुणे महानरपालिका व इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾एकूण पदे : 0179 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी + इतर पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत PDF जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन निवड केली जाईल.
◾वयोमर्यादा : 18 ते 45 वर्ष.
◾भरती कालावधी : रिक्त पदे ३१/०३/२०२५ या कालावधीपर्यन्तच भरावयाचे आहेत.
◾पदाचे नाव : योग प्रशिक्षक.
◾इतर आवश्यक पात्रता :
1] १०वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] नोंदणीकृत संस्थेचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र असणे.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व ३१५ वा वित्त आयोगांतर्गत भरण्यात येणाऱ्या मुलाखतीद्वारे करण्यात येईल, उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
◾सदरील पदे एन. यु. एच. एम. समिती अतर्गत राहतील. त्याचा पुणे महानगरपालिका कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
◾सदर पदे निव्वळ मानधन तत्त्वावर रु. २५०/- प्रती योग सत्र या दराने केवळ दि. ३१/०३/२०२५ या कालावधीपर्यन्तच भरावयाचे असून पुढील वर्षात प्रकल्प अंमलबजावणी कृती आराखडयात सत्र संख्या मंजूर नसल्यास अथवा प्रकल्प बंद होताच आपोआप संपुष्टात येईल. सन २०२४-२५ च्या कृती आराखडयामध्ये मंजूर होणाच्या योगसत्रांच्या संख्येनुसार नियुक्त होणाऱ्या योगशिक्षकांना योग सत्रे विभागून देण्यात येतील.
◾उपरोक्त नमूद करणेत आलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकामधील दिनांकास पहिल्या १ तासामध्ये म्हणजे सकाळी १० ते ११ या वेळेत जेवढे उमेदबार उपस्थित असतील अशा उमेदवारांची हजेरी नोंदवून व त्यांचेकडून विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे घेण्यात येतील. त्यानंतर उपस्थित असलेल्या उमेदवारांची मुलाखतीसाठी नोंदणी करणेत येणार नाही व याबाबतचा अंतिम निर्णय आरोग्य अधिकारी, पुणे मनपा यांचा राहील.
◾मुलाखतीला जास्त उमेदवार आल्यास छाननीअंती एका पदास पाच उमेदवार या प्रमाणे पदानुसार शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील पात्र गुण व अनुभवाचे गुण यांचे आधारे गुणांचा कट ऑफ लावून त्यानुसार मुलाखती घेण्यात येतील.
◾मुलाखतीसाठी उमेदवारांनी खालील कागदपत्रे घेवून स्वखचनि मुलाखतीस हजर रहावे :
1) आधार कार्ड ओळखपत्र.
2) मिनिस्ट्री ऑफ आयुष अथवा योगा सर्टिफिकेशन बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचे, मान्यताप्राप्त विद्यापीठाचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र.
3) १० वी ची मार्कशीट
4) शासकीय व नोंदणीकृत खाजगी संस्थेचे, योग प्रशिक्षकाचे प्रमाणपत्र आवश्यक.
◾शासकीय अनुभव धारकास प्राधान्य देण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 24 डिसेंबर 2024 पर्यंत .
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.