Pune Mahanagarpalika Bharti 2025 : आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मधील राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत रिक्त पदे भरावयाची आहेत. त्या साठी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात इंटिग्रेटेड हेल्थ अँड फैमिली वेलफेयर सोसायटी – टी.बी. आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : Vacancies are to be filled under the National Tuberculosis Eradication Programme under the National Urban Health Mission (NUHM) under the Integrated Health and Family Welfare Society for Pune Municipal Corporation under the control of the Health Department, Pune Municipal Corporation.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : इंटिग्रेटेड हेल्थ अँड फैमिली वेलफेयर सोसायटी – टी.बी. आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : विविध पदे. (अधिकृत जाहिरात वाचा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 20,000 रूपये (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
📑 अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ६५ वर्षांपर्यंत.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️जिल्हा पी.पी.एम ममन्वयक :
i) पोस्ट ग्रॅज्युएट ii)संवाद/एसीएसएम/सार्वजनिक-खाजगी भागीदारी/आरोग्य प्रकल्प/कार्यकमांमध्ये एक वर्षाचा अनुभव.
▪️ वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (एस.टी.एस) : 1) बॅचलर डिग्री किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स.
2) संगणक संचालनामध्ये प्रमाणपत्र कोर्स (किमान २ महिने)
▪️टीवी हेल्थ व्हिजिटर : 1) विज्ञानात पदवी किंवा ii)विज्ञान विषयामध्ये इंटर्मीडिएट (१०+२) आणि MPW/LHV/ANM/आरोग्य कामगार म्हणून कामाचा अनुभव/स्वास्थ्य शिक्षण/सल्ला या क्षेत्रातील प्रमाणपत्र किंवा उच्च शैक्षणिक पात्रता.
◾एकूण पदे : 012 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर (शासकीय सुट्टी बगळता) ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. तदनंतर अर्जाची छाननी करून उमेदवारांची पात्र अपात्र इत्यादीबाबत सविस्तर माहिती वेळोवेळी पुणे संकेतस्थळावर https://www.pmc.gov.in प्रसिद्ध करण्यात येईल.
◾अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील :– 1) पासपोर्ट आकाराचा फोटो,
2) जन्म तारखेकरिता (वयाचा दाखला/दहावीचा शाळासोडल्याचा दाखला/टीसी/जन्म प्रमाणपत्र)
3) फोटो आयडी/रहिवाशी दाखला
4) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र :- अ) शेवटच्या वर्षांची गुणपत्रिका, व) अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्र, क) अनुभव प्रमाणपत्र ड) शैक्षणिक अर्हता व प्राधान्य पात्रता प्रमाणपत्र या अनुषंगाने इतर आवश्यक स्वयम साक्षांकित प्रती.
◾सदरील पदे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) समिती अंतर्गत राहतील, त्याचा पुणे महानगरपालिका आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
◾उमेदवाराकडून सदर अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही.
◾एकूण पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो.
◾सदरील पदे निव्वळ कंत्राटी कालावधीसाठी भरायचे असून प्रकल्प बंद होताच सदरील पदे आपोआप संपुष्टात येतील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 एप्रिल 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी, पुणे महानगरपालिका, शहर क्षयरोग केंद्र, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र (गाडीखाना), ६६६ शुक्रवार पेठ, मंडई जवळ, शिवाजीरोड, पुणे ४११००२.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.