पुणे महानगरपालिका भरती 2025 | मासिक वेतन : 23,100 रुपये | Pune Mahanagarpalika Bharti 2025

Pune Mahanagarpalika Bharti 2025 : आरोग्य खात्याकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिका यांच्या गाडीखाना येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटकरीता पुणे मनपा रुग्णालयांतील FICTC केंद्रासाठी नेमणूकीसाठी रिक्त पदे भरणेत येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अतिरिक्त आयुक्त (जनरल) महापालिक तथा सहअध्यक्ष, पणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : The Pune City AIDS Control Organization of the Health Department, Pune Municipal Corporation is recruiting for the Project Management Unit at Gadikhana for the FICTC Center in Pune Municipal Hospitals. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : पणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदाचे नाव : समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
1) समुपदेशक : 23,100/- रुपये.
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 23,100/- रुपये.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.
भरती कालावधी : करार पद्धतीने 6 महिन्याकरीत रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
इतर आवश्यक पात्रता :
▪️समुपदेशक :

1) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण असणे.
2) एच.आय.व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान 3 वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ :
1) मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस.सी.) व डि.एम.एल.टी. उत्तीर्ण असणे.
2) एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
एकूण पदे : 012 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾उमेदवारांनी अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात व अलिकडच्या काळातील पासपोर्ट साईजच्या फोटो व स्वाक्षरीसह तसेच सर्व दृष्टीने परिपूर्ण असावे.
◾जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून पुढील 8 दिवसांपर्यंत सोमवार ते शुक्रवार (शासकीय सुट्टी वगळून) सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत समक्ष अर्ज सादर करावयाचा आहे. या व्यतिरिक्त दुस-या पध्दतीने कलेले अर्ज तसेच विहित दिनांकानंतर व वेळेनंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾पात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचे ठिकाण, तारीख, वेळ, इ. पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल. उमेदवारांना स्वतंत्ररित्या फोन, मॅसेज, ईमेल, इ. केले जाणार नाहीत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : ०९ जुलै २०२५ (शासकीय सुट्टी वगळून).
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, 1 ला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे 411002.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!