Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिका अंतर्गत समाज विकास विभाग मध्ये भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. 12वी, डिप्लोमा, ITI व इतर पात्रता असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात उप आयुक्त, समाज विकास विभाग व पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for filling the Social Development Department under Pune Municipal Corporation. Eligible and interested candidates should submit their applications.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : समाज विकास विभाग व पुणे महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : विविध पदे. (अधिकृत PDF जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी, डिप्लोमा, ITI, व इतर आवश्यक पात्रता उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 58 वर्ष.
◾भरती कालावधी : ०६ महिने मुदतीकरीता रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज सुरू : 24 डिसेंबर 2024 पासून अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾पदाचे नाव व पात्रता :
▪️फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग आणि फोटो लॅमिनेशन, ॲडव्हान्स्ड कोर्स-कलर फोटोग्राफी आणि कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी इन्स्ट्रक्टर : सरकारने मान्यता दिलेल्या थीमॅटिक प्रशिक्षण + अनुभवाच्या 01 वर्षात उत्तीर्ण.
▪️वायरिंग, मोटर रिवाइंडिंग आणि इलेक्ट्रिकल अप्लायन्स रिपेअर इंस्ट्रक्टर : ITI पास + अनुभव.
▪️फ्रीज एसी दुरुस्ती प्रशिक्षक : डिप्लोमा / ITI + अनुभव.
▪️मोबाईल रिपेअर इंस्ट्रक्टर: डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स / M.C.V.C. + अनुभव.
▪️फॅशन डिझायनिंग इन्स्ट्रक्टर : शिलाई प्रशिक्षण अभ्यासक्रम + अनुभवामध्ये ०१ वर्षांचा शासन मान्यताप्राप्त पूर्ण.
▪️भरतकाम प्रशिक्षक : प्रत्येक विषय + अनुभवाचा 01 वर्षांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला.
▪️ब्युटी पार्लर प्रशिक्षक : एबीटीसी/सीडीएससीओ ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण + अनुभव.
▪️दुचाकी प्रशिक्षक : आयटीआय / ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा / N.C.T.V.T. उत्तीर्ण + अनुभव.
▪️टू व्हीलर रिपेअर ट्रेनिंग क्लास असिस्टंट : विषयावर किमान 06 महिने प्रशिक्षण उत्तीर्ण + अनुभव.
▪️चारचाकी दुरुस्तीचे प्रशिक्षक : आयटीआय / ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा + अनुभव.
▪️चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक : विषय + अनुभवावर किमान 06 महिन्यांचे प्रशिक्षण उत्तीर्ण.
▪️संगणक टायपिंग प्रशिक्षक : 12वी उत्तीर्ण आणि सरकारी टायपिंग परीक्षा इंग्रजी 60 s.p.m., मराठी 40 s.p.m. आणि हिंदी 40 s.p.m., MSCIT + अनुभव.
▪️इंग्रजी संभाषण प्रशिक्षक : B.A. / इंग्रजीमध्ये M.A.
▪️जेंट्स पार्लर (मूलभूत आणि प्रगत) प्रशिक्षक : एबीटीसी/सीडेस्को ब्युटी पार्लरमधील प्रशिक्षण + अनुभव.
▪️संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक : B.E. इलेक्ट्रॉनिक + अनुभव.
▪️संगणक मूलभूत : MS-CIT, TALLY, 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक : BCA / MCA / BCS / MCS / MCM / I.T. + अनुभव.
◾इतर पदे : आवश्यक शैक्षणिक पात्रतासाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.
◾एकूण पदे : 029 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾वरील पदांवरील नेमणूका शैक्षणिक पात्रता, शासकीय व निमशासकीय विभागाकडे काम केल्याचा अनुभव व समाज विकास विभागाकडील (नागरवस्ती विकास योजना) कामाचा अनुभव इ. च्या आधारे परिक्षण करून व गुणानुक्रमे निवड व प्रतिक्षा यादी तयार करून सहा महिने मुदतीकरीता दरमहा एकवट मानधनावर तसेच बेंच निहाय करार पद्धतीने नेमणूक करण्यात येतील.
◾अर्ज करताना उमेदवारांची जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालान्त परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची स्वयं-साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
◾अर्जदार महिला विवाहित असल्यास शासनमान्य विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अथवा शासनमान्य गॅजेटची (राजपत्र) स्वयं-साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
◾अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे दाखले, अनुभवाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून व पानवारी (पेजींग) करून व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, पुणे ०५ (दूरध्वनी या ठिकाणी अर्जदाराने स्वतः उपस्थित राहून दि. २४/१२/२०२४ ते ०२/०१/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी २.०० पर्यंत सादर करणेत यावा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 02 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, पुणे (पोस्टाने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत).
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.