पुणे महानगरपालिका येथे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | मासिक वेतन – 16,000 रूपये | आजचं अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

पुणे येथे नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. पुणे महानगरपालिका, शिक्षण विभाग प्राथमिक येथे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये क्रीडा मार्गदर्शक [कबड्डी १, खोखो-१, हॅण्डबॉल-२, थ्रो बॉल-१, योगासन-३, बॉल बॅडमिंटन-१, अॅथलेटिक्स-३, क्रिकेट-१, ज्युदो-१, तलवारबाजी-२, सेपाक टकरा-१, नेट बॉल-१] ही एकूण 018 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर, बी.पी.एड. किंवा बी.एड. (फिजिकल) एम.पी.एड. अथवा एन.आय.एस. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. १६,००० मासिक वेतन दिले जाणार आहे. ५० वर्षपेक्षा जास्त वय असलेले उमेदवार अर्ज करू करू शकणार नाहीत. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. भरतीसाठी लागणारी शैक्षणिक / व्यावसायिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून अंतिम तारीख पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. महिला विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शासकीय व अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे व प्रक्रियेत बदल करण्याचे अधिकार मा. महापालिका आयुक्त यांना राहतील. अर्जदाराने आपले अर्ज शिक्षण विभाग प्राथमिक पुणे मनपाने जाहिरातीमध्ये निश्चित केलेल्या अर्जाप्रमाणे करणे बंधनकारक राहील. अर्ज करण्याचा पत्ता : प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे मनपा, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे-४११००५. 20 सप्टेंबर 2024 रोजी पासून या भरतीला सुरुवात झाली आहे. तर 27 सप्टेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.

error: Content is protected !!