पुणे महानगरपालिका अंतर्गत 12वी पास व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

पुणे महानगरपालिका, समाज विकास विभाग अंतर्गत मासिक तासिका साठी मानधनतत्वावर प्रशिकांची सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. एकूण 012 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 16 जुलै 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा. नियम व अटी : अर्जदार महिला विवाहित असल्यास शासनमान्य विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अथवा शासनमान्य गॅजेटची (राजपत्र) स्वयं-साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे दाखले, अनुभवाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून व पानवारी (पेजींग) करून अर्ज करावा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उपरोक्त कागदपत्रांच्या मूळ प्रती निवड झालेल्या उमेदवारांनी रूजू होताना दाखविणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र सोबत कागदपत्रे साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे. अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली नसल्यास तसेच अर्जासोबत उपरोक्त नमूद दाखल्याच्या प्रती जोडलेल्या नसल्यास सदरचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जासोबत दिलेली माहिती व मूळ कागदपत्रांत काही दोप आढळल्यास अशा नेमणूका बाद करण्यात येतील. निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार मा. उप आयुक्त (सविवि), पुणे महानगरपालिका, पुणे यांनी राखून ठेवले आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सदर नियुक्त्या प्रति बेंच मासिक (तासिका) मानधनावर होणार असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना मनपाच्या आस्थापनेवरील कोणत्याही पदावर कायमस्वरूपी नियुक्तीकरीता हक्क सांगता येणार नाही. तसेच मनपा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेले कोणतेही लाभ मिळण्यास ते पात्र ठरणार नाहीत. निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पुर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारास सेवेत रूजू होण्यापूर्वी एका बॅचचे मानधन अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल. त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!