पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवर गट ड संवर्गातील पदे ११ महिने कालावधीसाठी बाह्ययंत्रणेमार्फत भरावयाची आहेत. त्यासाठी ई-निविदा पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्था / कंपनी मार्फत खालील पदे पुरवठा करण्यासाठी दि. 24 सप्टेंबर 2024 ते 03 ऑक्टोंबर 2024 सायंकाळी 06.00 वा. पर्यंत या कालावधीत निविदा अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये सफाईगार (पूर्णवेळ, अर्धवेळ), कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, भोजन सेवक ही एकूण 0152 पदे भरली जात आहेत.
जे उमेदवार पुणे येथे नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें संस्था / कंपनी मार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत. 24 सप्टेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 ऑक्टोबर 2024 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, २, साधु वासवानी रोड, कॅम्प पुणे ४११००१ हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.