Pune Vanvibhag Bharti 2025 : केंद्र शासनाच्या वन, पर्यावरण आणि हवामान बदल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय हरित सेना योजना’ या उपक्रमांतर्गत राज्यभरातील शाळांमध्ये इको क्लब स्थापन करण्यात आले आहेत. या इको क्लब शाळांमध्ये Environment Education Programme अंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाते. या कामकाजाचे समन्वय, अंमलबजावणी, पर्यवेक्षण आणि माहिती संकलन यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयात रिक्त पदासाठी भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे अर्ज सादर करावा. अधिकृत PDF जाहिरात आणि अर्ज खाली पहा.
◾भरतीचा तपशील :
▪️भरती विभाग: महाराष्ट्र वनविभाग द्वारे जाहिरात प्रकाशित.
▪️शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
▪️मासिक मानधन: जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे.
▪️नोकरी ठिकाण: पुणे.
◾ PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धत: ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾या भरती मध्ये एकूण पदे: 01 जागा रिक्त असलेल्या भरल्या जात आहेत.
◾आवश्यक पात्रता
1. उमेदवार पर्यावरण विज्ञान, वनीकरण, वनस्पतीशास्त्र किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीधर असावा.
2. पर्यावरण शास्त्र शाखेचा उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.
3. पर्यावरण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था किंवा समुदाय आधारित प्रकल्पांमध्ये कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. (अनुभवाचे प्रमाणपत्र आवश्यक.)
4. वने आणि पर्यावरणीय कायद्यांचे ज्ञान असावे.
5. मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये उत्कृष्ट संवाद कौशल्य असावे.
6. संगणक वापरण्याचे कौशल्य (MS Office, ई-मेल आणि मूलभूत डिजिटल साधने) असावे.
◾मुलाखत व अर्ज प्रक्रिया
▪️मुलाखत दिनांक: 03 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता.
▪️स्थळ: प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2025.
◾अर्ज सादरीकरणाचे मार्ग: पोस्टाद्वारे, प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा ई-मेलद्वारे अर्ज पाठवू शकता.
▪️ई-मेल आयडी: peefsfd@mahaforest.gov.in / peefsfm@gmail.com
▪️पत्ता: प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, मध्यवर्ती इमारत, पुणे – 411001
◾अधिक माहितीसाठी व अटींसाठी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
