Pune Zp Bharti 2025 : पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागात कामासाठी नवीन रिक्त पदाची नेमणूक करणेसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, वय व इतर अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद पुणे, आरोग्य विभाग अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या. भरती बद्दल आवश्यक माहिती व अधिकृत pdf जाहिरात खाली दिली आहे.
Pune Zp Bharti 2025 : Interested candidates who meet the required educational qualifications, age and other conditions are invited to apply for the new vacant post for work in the tribal areas of Pune district.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : जिल्हा परिषद पुणे व आरोग्य विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली अधिकृत PDF जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾ मासिक मानधन / वेतन : 40,000/- रुपये.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत घेतली जाणार आहे.
◾वयोमर्यादा : 38 वर्षां पर्यंत.
◾भरती कालावधी : ११ महीन्याच्या कालावधी करीता ही पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी.
◾आवश्यक पात्रता : बी.ए.एम.एस. व महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलचे मोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे .
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾सदरची नियुक्ती हि नेमणूकीच्या दिनांकापासून ११ महीने कालावधीसाठी असून निवड केलेल्या उमेदवाराला नेमणूकीच्या ठिकाणी वास्तव्य करुन आरोग्य सेवा दयावी लागेल.
◾कोणत्याही स्वरुपाची रजा देय नाही.
◾मुलाखतीस उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
◾हि पदे राज्यशासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत.
◾निवड झालेल्या उमेदवारास रु ५००/- च्या बॉन्ड पेपरवर अटी व शर्तीबाबत हमीपत्र लिहून दयावे लागेल.
◾अर्जदाराने अर्ज ए-४ आकाराच्या कागदावर करावयाचा असून त्यामध्ये खालील बाबी अंतर्भुत कराव्यात.
◾उमेदवाराची सर्वसाधारण माहितीः-
1] ठळक अक्षरात स्वतःचे नांव.
2] अर्जदाराचे संपूर्ण पत्ता, दुरध्वनी क्रमांक / भ्रमणध्वनी क्रमांक (अनिवार्य)
3] कामाचा अनुभव काम केलेली संस्था व कालावधी.
4] शैक्षणिक अर्हतेचा संपूर्ण तपशिल अभ्यासक्रमाचे नाव, संस्था, विदयापीठाचे नांव, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, गुणांची टक्केवारी.
5] आवश्यक कागदपत्रांच्या सांक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती व मुळ कागदपत्र सोबत आणावे.
6] शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे.
7] शाळा सोडल्याचा दाखला व जन्मतारखेचा दाखला.
8] अनुभवाचे प्रमाणपत्र.
9] 2 पासपोर्ट आकाराचे फोटो.
◾अर्जाची नोंदणी व छाननी मुलाखतीच्या दिवशीच करण्यात येईल व पात्र उमेदवारांच्या त्याच दिवशी मुलाखती घेण्यात येतील.
◾भरती प्रक्रिया स्थगित करणे किया रदद करणे/ अंशतः बदल करणे तसेच भरती प्रक्रियेसंदर्भातील संपूर्ण अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी स्वतःकडे राखून ठेपले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही व कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही.
◾मुलाखतीची तारीख : 03 जानेवारी 2025 ला मुलाखत घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीची पत्ता : शिवनेरी सभागृह आरोग्य विभाग जि.प.पुणे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.