अधिकृत जाहिरात (pdf) | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
जिल्हा परिषद पुणे, आरोग्य विभाग व्दारे मानसेवी वैदयकिय अधिकारी पदाकरिता तात्पुरत्या नेमणूकीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे जिल्हयातील आदिवासी भागात भरारी पथक भोरगिरी, प्रा. आ. केंद्र डेहणे तालुका खेड व भरारी पथक ढाकाळे. प्रा.आ. केंद्र डिंभा तालुका आंबेगाव येथे नेमणूकीच्या दिनांकापासून ११ महीन्या पर्यंत मानसेवी वैदयकिय अधिकारी पदाची नेमणूक करणेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे जिल्हा परिषद पुणे यांचे कार्यालयाकडून दिनांक ३/१/२०२५ रोजी सकाळी ११. वाजता थेट मुलाखती (वॉक इन इन्टरव्यू) घेण्यात घेणार आहेत.
त्याकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, वय व इतर अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया स्थगित करणे किया रदद करणे/ अंशतः बदल करणे तसेच भरती प्रक्रियेसंदर्भातील संपूर्ण अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी स्वतःकडे राखून ठेपले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही व कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.