Rahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधताय? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 0787 पदे भरली जात आहेत. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात वाचा. या भरती मध्ये 4थी / 7वी / 10वी / 12वी / पदवीधर / ITI उत्तीर्ण उमेदवारांची भरती केली आहे. रिक्त असणारी पदे, या भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती, PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
Rahuri Krishi Vidyapeeth Bharti 2025 : Looking for a government job? Mahatma Phule Agricultural University Rahuri has published an advertisement to fill various posts. A total of 0787 posts are being filled in this recruitment. Eligible and interested candidates should read the PDF advertisement given below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भरती विभाग : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾एकूण भरण्यात येणारी पदे : 0787 जागा.
◾भरती पदाचे नाव : संगणक चालक, शिपाई, पहारेकरी, प्रयोगशाळा सेवक, सुरक्षारक्षक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, ड्रायव्हर, वायरमन, सहाय्यक (संगणक), कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, टंकलेखक व इतर पदे.
◾आवश्यक शैक्षणिक पात्रता : 7वी / 10वी / 12वी / ITI / पदवीधर व इतर आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष.
◾अतिशय महत्वाचे :
1) सदर जाहिरात फक्त महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता (विद्यापीठ प्रकल्पग्रस्त) प्रसिध्द करण्यात येत असल्यामुळे इतर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज सादर करु नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते विचारात न घेता अपात्र ठरविण्यात येतील.
2) प्रकल्पग्रस्त अर्जदार हा मूळ खातेदाराचा नातु / पणतु असल्यास अशा उमेदवाराने / अर्जदाराने वंशावळी बाबतचे रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील.
3) विद्यापीठ प्रकल्पग्रस्त असल्याबाबत संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी, यांचेकडील विहीत नुमन्यातील वैध प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची सत्यप्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.
◾भरती शुल्क :
1) अराखीव (खुला) प्रवर्ग : १०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र)
2) मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक/अनाथ : ९००/- (अक्षरी रुपये नऊशे मात्र).
◾निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व व्यावसायिक / शारीरिक चाचणी यामधील गुण एकत्रित करुन गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्या आधारे सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदांच्या अनुषंगाने निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येऊन ती वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल.
◾नोकरी ठिकाण : कृषी विद्यापीठ, राहुरी.
◾अंतिम दिनांक : 30 जानेवारी 2025.
◾अर्ज सादर करण्याचा पत्ता : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचून घ्या.