PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी नोकरी शोधताय? महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, करिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पाकरिता (कृषि विद्यापीठाकरिता) जमिनी दिलेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तां करिता राज्यातील कृषि विद्यापीठांतील गट क व गट ड संवर्गातील एकुण भरावयाच्या पदांपैकी ५० टक्के रिक्त पदे त्याच कृषि विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधुन भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 डिसेंबर 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
वरील शासन निर्णयातील तरतूदीनुसार महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर, (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत विविध कार्यालयातील प्रकल्पग्रस्तांचा सरळसेवेचा अनुशेष भरुन काढण्याकरिता विशेष भरती मोहिमे अंतर्गत सोबतच्या विहित नमुन्यामध्ये पात्र उमेदवारांकडुन दिनांक 30 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात फक्त महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता (विद्यापीठ प्रकल्पग्रस्त) प्रसिध्द करण्यात येत असल्यामुळे इतर कोणत्याही प्रकल्पातील प्रकल्पबाधित उमेदवारांनी अर्ज सादर करु नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते विचारात न घेता अपात्र ठरविण्यात येतील.
विहीत नमुन्यांतील अर्ज दिनांक 30 जानेवारी 2025 पर्यंत अथवा तत्पूर्वी संगणकीकृत ८.५ X १४ आकाराचे पेपरवर टंकलिखीत करुन सादर करण्यात यावेत, उपरोक्त जाहिरातीचा तपशील या विद्यापीठाचे संकेतस्थळ mpkv.ac.in वर आणि शासनाचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.