रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2025 | एकूण पदे : 9,970 | Railway Assistant Loco Pilot Bharti 2025

Railway Assistant Loco Pilot Bharti 2025 : रेल्वे भरती बोर्ड (RRB) व्दारे सहाय्यक लोको पायलट भरती 2025 जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय रेल्वेत नोकरीस इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. रेल्वे भरती बोर्डांनी सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांसाठी एकूण 9,970 रिक्त जागा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Railway Recruitment Board (RRB) has released the Assistant Loco Pilot Recruitment 2025 advertisement. There is a golden opportunity for the candidates who are interested in getting a job in Indian Railways. Railway Recruitment Board has announced a large recruitment to fill a total of 9,970 vacancies for the posts of Assistant Loco Pilot (ALP).

भरती विभाग : भारतीय रेल्वे भरती बोर्ड व्दारे भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी (Government Job) मिळविण्याची चांगली संधी आहे.
एकूण पदसंख्या : 9970 जागा भरल्या जात आहेत.
मासिक वेतन : 7 व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार लेव्हल-2. प्रारंभिक वेतन: ₹19,900/- प्रतिमाह असेल.
महत्वाच्या तारखा:
1) ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 12 एप्रिल 2025
2) शेवटची तारीख: 11 मे 2025 (रात्री 11:59 पर्यंत)
3) फी भरण्याची अंतिम तारीख: 13 मे 2025
4) अर्जात सुधारणा करण्यासाठी विंडो : 14 मे ते 23 मे 2025
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
परीक्षा शुल्क:
1) सर्वसामान्य : 500 रूपये.
2) इतर  : 250 रूपये.
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे ITI (NCVT/SCVT) प्रमाणपत्र किंवा संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा / इंजिनिअरिंग डिग्री असणे आवश्यक आहे. (अर्ज सादर करताना शिक्षण पात्रता पूर्ण असावी. प्रतीक्षेत असलेले उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.)
वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी):
1) उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
2) आरक्षणानुसार सूट:
SC/ST: 5 वर्षे
OBC (NCL): 3 वर्षे
3) इतर गटासाठी सवलती लागू आहेत (PDF मधील तपशील पहावा).
निवड प्रक्रिया: ही भरती प्रक्रिया पाच टप्प्यांमध्ये पार पडणार आहे:
1. प्रथम चरण CBT (CBT-1): 75 प्रश्न, 60 मिनिटे. निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा. हा फक्त स्क्रीनिंग टप्पा आहे.
2. द्वितीय चरण CBT (CBT-2):
दोन भाग:
भाग A: 100 प्रश्न, 90 मिनिटे (गुणांकनात विचारात)
भाग B: 75 प्रश्न, 60 मिनिटे (फक्त पात्रता तपासणी)
निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीसाठी 1/3 गुण वजा
3. CBAT (Computer Based Aptitude Test):
केवळ पात्र उमेदवारांसाठी.
प्रत्येक टेस्ट बॅटरीमध्ये किमान 42 गुण आवश्यक.
अंतिम गुणांमध्ये याचे 30% वजन असते
4. कागदपत्र तपासणी (Document Verification)
5. वैद्यकीय चाचणी (Medical Examination): A-1 श्रेणीमध्ये पात्रता आवश्यक

महत्त्वाचे :
1) एकाच उमेदवाराचा फक्त एकच अर्ज स्वीकारला जाईल.
2) अर्ज करताना निवडलेले RRB नंतर बदलता येणार नाही.
3) उमेदवाराने वैयक्तिक मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अ‍ॅक्टिव्ह ठेवावा.
4) आधार प्रमाणीकरण केल्यास भरती प्रक्रिया सोपी होते.
5) अर्जात दिलेल्या नाव, जन्मतारीख, फोटोग्राफ, सही इत्यादी तपशीलामध्ये सुधारणा नंतर होऊ शकत नाहीत.

ऑनलाईन अर्ज पद्धत:
1. अधिकृत RRB संकेतस्थळावर जाऊन खाती तयार करा.
2. सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा.
3. ऑनलाईन फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
4. अर्ज पूर्ण झाल्यानंतरच याची पुष्टी मिळेल.
◾अधिक माहितीसाठी www.rrbmumbai.gov.in किंवा आपल्या विभागाच्या RRB संकेतस्थळाला भेट द्या.
◾जर तुम्हाला भरतीशी संबंधित अधिक माहिती हवी असल्यास किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये अडचण आल्यास, अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क करा:
ई-मेल: rrbhelp@csc.gov.in
फोन: 0172-565-3333 / 9592001188
◾तयारीला सुरुवात करा! सरकारी रेल्वे नोकरीची सुवर्णसंधी गमावू नका!

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!