PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (14 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.) | येथे क्लीक करा |
रेल्वे मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. रेल्वे भरती मंडळ (NTPC) अंतर्गत विविध तब्बल 011,558 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क ही पदे भरली जात आहेत. तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
अटी व नियम : उमेदवारांनी जाहिरात मध्ये दिलेल्या तपशिलांवर आधारित उमेदवारांची पात्रता आहे की नाही हे तपासावे. उमेदवारांनी स्वतःचे समाधान करणे आवश्यक आहे की ते या पदासाठी पात्र आहेत, जर अर्जामध्ये केलेला कोणताही दावा सिद्ध झाला नाही, तर उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. निवड प्रक्रिया सुरु झालेनंतर किंवा निवडीच्या कोणत्याही क्षणी अगर निवड झाल्यानंतर उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती कागदपत्रे तपासणीनंतर खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी/ नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करणेत येईल.
सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) कडे राहील. अर्ज करण्याची शेवटची तारीख CEN 05/2024 [पदवीधर साठी] 13 ऑक्टोबर 2024 आणि CEN 05/2024 [अंडरग्रेजुएट साठी] 20 ऑक्टोबर 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.