रयत शिक्षण संस्था मध्ये 0154 नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : रयत शिक्षण संस्था, ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित आणि नामांकित शैक्षणिक संस्था आहे. दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विविध विषयांसाठी अध्यापन पदे भरावयाची आहेत. संस्थेच्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालये व आदर्श शिक्षण योजना अंतर्गत शिक्षणासाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांना आमंत्रित करण्यात येत आहे. भरतीची जाहिरात रयत शिक्षण संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : Rayat Shikshan Sanstha is a prestigious and renowned educational institution in Maharashtra. Like every year, this year too, teaching posts are to be filled for various subjects for the academic year 2025-26. This recruitment will be for teaching under the secondary schools and Adarsh ​​Shikshan Yojana of the institute.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : ‘रयत शिक्षण संस्था’ द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदे : विविध पदे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात, अधिकृत वेबसाईट व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 अधिकृत
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 अधिकृत
वेबसाईट
येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : भरती कालावधी स्पष्टपणे नमूद केलेला नाही, परंतु खालील दिलेल्या Pdf जाहिरात मध्ये बघावी.
पदाचे नाव : मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कला, नृत्य व संगीत शिक्षक, क्रीडा शिक्षक, सहसंचालक, के.जी. शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️मुख्याध्यापक (Principal) : B.A./B.Sc. M.A./M.Sc. B.Ed. आवश्यक
▪️इंग्रजी विषयाचे सहाय्यक शिक्षक : H.S.C. (१२वी) B.A. / B.Sc. D.Ed. किंवा B.Ed.
▪️गणित विषयाचे सहाय्यक शिक्षक : H.S.C. B.Sc. D.Ed. किंवा B.Ed.
▪️विज्ञान विषयाचे सहाय्यक शिक्षक : B.Sc. D.Ed. किंवा B.Ed.
▪️मराठी विषयाचे सहाय्यक शिक्षक : H.S.C. B.A. D.Ed. किंवा B.Ed.
▪️इतिहास/भूगोल विषयाचे सहाय्यक शिक्षक : B.A. D.Ed. किंवा B.Ed.
▪️क्रीडा शिक्षक : B.P.Ed.
सामान्य सूचना : सर्व पदांसाठी संबंधित विषयातील पदवी आणि B.Ed./D.Ed./B.P.Ed. आवश्यक आहे.
एकूण पदे : 0154 जागा.
नोकरी ठिकाण : सातारा.
◾भरती ही तात्पुरती स्वरूपाची (Contract Basis) असून, संस्थेच्या गरजेनुसार कालावधी ठरवला जाईल.
◾उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल; लेखी परीक्षा होणार नाही.
◾उमेदवाराने शैक्षणिक पात्रता पूर्ण असावी व त्याचे मूळ प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
◾उमेदवार एकाच पदासाठी अर्ज करू शकतो.
◾निवड झाल्यानंतर उमेदवारास कोणत्याही शाखेत नियुक्त केले जाऊ शकते.
◾उमेदवाराने महाराष्ट्र शासन मान्य शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पूर्ण केलेली असावी.
◾शासन नियमांप्रमाणे आरक्षणाचा लाभ लागू राहील.
◾सर्व अधिकार संस्थेच्या प्रशासनाकडे राखीव असून, कोणतीही विनंती/दाद घेण्यात येणार नाही.
◾वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी प्रवेशपत्र पाठवले जाणार नाही. इच्छुकांनी थेट उपस्थित राहावे.
◾उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती (शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, अनुभव प्रमाणपत्र, जातीचा दाखला, D.Ed./B.Ed./B.P.Ed. प्रमाणपत्र इत्यादी) स्वतःसह आणाव्यात.
◾कोणतेही TA/DA दिले जाणार नाही.
◾मुलाखतीच्या दिवशी 30 मिनिटे अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
◾निवड झाल्यावर उमेदवारास संस्थेच्या नियमानुसार वेळोवेळी प्रशिक्षण व जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
◾मुलाखतीसाठी अधिक माहिती हवी असल्यास संस्थेच्या वेबसाईटला भेट द्या: www.rayatshikshan.edu
मुलाखतीची तारीख : 27 एप्रिल 2025.
मुलाखतीची पत्ता : अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प, सातारा, ता. जि. सातारा 415001 / आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा ता. जि. सातारा. पिन कोड – 415001.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!