RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वे मध्ये 08868 पदांची भरती.

भारतीय रेल्वे द्वारे विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 08868 रिक्त पदांसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात रेल्वे भरती मंडळ (RRB) द्वारे प्रकाशित करण्यात आली असून, तांत्रिक व अवतांत्रिक दोन्ही प्रकारच्या पदांचा यात समावेश आहे. रेल्वेसारख्या मोठ्या आणि स्थिर सरकारी विभागात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

या भरतीमध्ये स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन्स क्लर्क अशा विविध पदांची नियुक्ती केली जाणार आहे. संबंधित पदानुसार 12वी उत्तीर्ण ते पदवीधर पात्रता आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीत दिलेली पात्रतेसंबंधी माहिती नीट तपासावी.

ग्रॅज्युएट जाहिरातयेथे क्लीक करा
अंडरग्रॅज्युएट जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे. भरती प्रक्रिया कायमस्वरूपी नोकरी मिळविण्यासाठी आहे, त्यामुळे निवड झाल्यानंतर स्थिर आणि नियमानुसार सेवा मिळू शकते. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, फॉर्म भरताना CEN मध्ये नमूद केलेल्या सर्व सूचना नीट वाचणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख उमेदवारांच्या शैक्षणिक श्रेणीनुसार वेगवेगळी आहे. Graduate उमेदवारांसाठी 20 नोव्हेंबर 2025 आणि Undergraduate उमेदवारांसाठी 27 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे. पदांचे कार्यस्थळ संपूर्ण भारत असेल. अधिक माहिती, PDF जाहिरात आणि अर्ज लिंक RRB च्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी विलंब न लावता वेळेत अर्ज करावा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo