सरकारी नोकरी : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य भरती 2025 | Sainik Kallyan Vibhag Maharashtra Bharti 2025

Sainik Kallyan Vibhag Maharashtra Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधताय? सैनिक कल्याण विभागच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लिपिक टंकलेखक गट “क” या पदाकरीता ही भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : ही भरती जाहिरात सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य द्वारे प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी. (Government Job) मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 072 पदे भरली जात आहेत.
◾पदे : लिपिक टंकलेखक (गट-क).
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 19,900 ते 63,200 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वय : 45 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार
◾आवश्यक पात्रता : अर्ज फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾इतर पात्रता :
(अ) सशस्त्र दलामध्ये ज्यांनी १५ वर्षाहून कमी नाही इतकी सेवा बजावली असेल.
(ब) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा वा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील.
(क) मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान ३० शब्द असल्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ज्याच्या जवळ असेल.
◾TCS या कंपनीव्दारे ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरुपात असेल.
◾परीक्षा शुल्क :
(एक) अराखीव (खुला) रुपये १०००/-
(दोन) मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक रुपये ९००/-
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 नोव्हेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo