पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
नोकरी शोधताय? सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर व्दारे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये शासकीय बोर्डिंग स्कूल, नागपूर येथे शिक्षक हे पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखत करिता आमंत्रित करण्यात आले आहे.
पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उपलब्ध पदसंख्येनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरीता दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भरती मध्ये उमेदवाराची निवड ही गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना नेमणूक दिल्यानंतर शासन नियमानुसार मानधन अदा करण्यात येईल. तसेच मुलाखतीसाठी येण्याकरीता कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. मुलाखतीची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.