Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : तुम्ही 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची सविस्तर PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : If you are 10th / 12th / Graduate and looking for Govt job then this is best chance to get job. Social Welfare Commissionerate, State of Maharashtra has published advertisement to fill up various vacancies in Class-3 cadre through direct service.
◾महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) व्दारे ही भरती केली जात आहे.
◾समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरायची एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 0229 नवीन रिक्त पदे भरली जात आहेत.
◾रिक्त पदांची नावे : गृहपाल, लघुलेखक, टंकलेखक, व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पगार : 25,500 ते 81,100 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक पगार दिला जाणार आहे.
◾या भरतीची पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online).
◾अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रु. 1000/- तर राखीव श्रेणी – रु. 900/- रूपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾भरती पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️उच्चश्रेणी लघुलेखक
: 1} शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
2} १. उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र
3} मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण. वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य)
4} टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा
5} टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट
6} उन महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️निम्नश्रेणी लघुलेखक :
1} शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
2} निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण. वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य)
3} टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिटं किंवा
4} टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट
5} महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️लघुटंकलेखक
: 1} शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
2} लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहीजे. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र.
▪️वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक :
1} शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)
2} महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️गृहपाल (महिला) :

▪️गृहपाल (सर्वसाधारण) :

▪️समाज कल्याण निरीक्षक :

◾अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 11 नोव्हेंबर 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.