SBI Clerk Bharti 2024 – 2025 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कनिष्ठ सहकारी (ज्युनियर असोसिएट / लिपिक / क्लार्क) या पदांच्या नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तब्बल 13,735 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उमेदवार फक्त एकाच राज्य / केंद्रशासित प्रदेशातील रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. या मोठ्या भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
SBI Clerk Bharti 2024 - 2025 : Applications are invited from eligible Indian citizens for the appointment of Junior Associate (Clerk) posts in State Bank of India. This recruitment advertisement has been published to fill as many as 13,735 posts.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI BANK) व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 13,735 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : कनिष्ठ सहकारी (ज्युनियर असोसिएट / लिपिक / क्लार्क).
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष केंद्र सरकारने मान्यता दिलेली पात्रता.
◾मासिक वेतन : 26,730 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾SBI भरतीची अधिकृत जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : उमेदवार फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात.
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे नसावे. (वयोमर्यादा सिथीलतेसाठी अधिकृत जाहिरात पहा.)
◾अर्ज शुल्क : General/ OBC/ EWS यांना 750 रूपये तर SC/ ST/ PwBD/ XS/DXS यांना शुल्क नसेल.
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने खात्री करावी की तो / ती या पदासाठी वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता करतो.
◾निवड प्रक्रिया: निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन
चाचणी (प्राथमिक (पूर्व) आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी असेल.
◾वरील रिक्त जागा तात्पुरत्या आहेत आणि बँकेच्या प्रत्यक्ष गरजेनुसार त्या रिक्त जागा बदलू शकतात. उमेदवार फक्त एका राज्य / केंद्रशासित प्रदेशाच्या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.
◾प्राथमिक परीक्षा (पुर्ण परीक्षा) फेब्रुवारी २०२५ मध्ये तात्पुरती घेतली जाईल आणि मुख्य परीक्षा मार्च/एप्रिल २०२५ मध्ये तात्पुरती घेतली जाईल. उमेदवारांना तपशील आणि अपडेटसाठी नियमितपणे बँकेची वेबसाइट https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 जानेवारी 2025 | अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.