पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) येथे तब्बल 1511 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर ही पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) – डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) ही पदे भरली जाणार आहेत. जे उमेदवार मुंबई, महाराष्ट्र मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बी.टेक / बी.ई. किंवा एम.सी.ए. किंवा एम.टेक. / एम.एस्सी. ही लागणार आहे. तर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना रु. 48,480/- ते रु. 93,960/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. नियम व अटी : या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, अर्जदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याने/तिने निर्दिष्ट तारखेनुसार त्या पदासाठी वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर नामांकांची पूर्तता केली आहे.
जर भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आले की अर्जदाराने पात्रता निकषांची पूर्तता केली नाही आणि / किंवा त्याने / तिने कोणतीही चुकीची / खोटी माहिती दिली आहे किंवा कोणतीही वस्तुस्थिती दडवली आहे, तर त्याची / तिची उमेदवारी रद्द केली जाईल. 14 सप्टेंबर 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 ऑक्टोबर 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात पहा.