Shiva Trust Aurangabad Bharti 2024 : 10वी, 12वी, आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या भरती मध्ये लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, ग्रंथपाल, ग्रंथपाल सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, संगणक परिचालक, सुपरचानिक, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक व इतर पदांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. शिवा शैक्षणिक समुहा मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात शिवा ट्रस्ट शैक्षणिक संकुल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
Shiva Trust Aurangabad Bharti 2024 : 10th, 12th, and graduation candidates have good chance to get job. In this recruitment, applications are invited from eligible candidates to fill the vacancies for Accountant, Junior Accountant, Librarian, Assistant Librarian, Senior Clerk, Junior Clerk, Computer Operator, Superchan, Sweeper, Security Guard and other posts.
◾भरती विभाग : शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. त्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : संगणक परिचालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, लेडीज हॉस्टेल रेक्टर, स्कूल बस चालक, शिपाई, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, कार्यालय अधीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, ग्रंथपाल, ग्रंथपाल सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक. ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾व्यावसायिक पात्रता : 1] कार्यालय अधीक्षक – पदवीधर / एमबीए 2] लेखापाल – B.Com/M.com/Tally 5 Yrs. Exp 3] कनिष्ठ लेखापाल – B.Com/M.com/Tally 1 Yr. Exp 4] ग्रंथपाल – एम.लिब. (नेट/सेट) 5] ग्रंथपाल सहाय्यक – बी.लिब. / एम.लिब 6] वरिष्ठ लिपिक – पदवीधर (Marathi, English Typing) 7] कनिष्ठ लिपिक – पदवीधर (Marathi, English Typing) 8] संगणक परिचालक – पदवीधर (Marathi, English Typing) 9] लेडीज होस्टेल रेक्टर – पदवीधर (अनुभव असल्यास प्राधान्य) 10] स्कुल बस ड्रायव्हर – १०वी पास (दहन चालविण्याचा परवाना बेंच बिल्लासह 11] शिपाई – १०वी १२वी पास/नापास 12] सुरक्षा रक्षक – १०वी/१२वी पास/नापास 13] सफाई कामगार – १०वी पास/नापास 14] प्रयोगशाळा तंत्रज्ञ – एम.एस्सी/बी.एस्सी./डि.फार्म 15] सुपर वायझर – पदवीधर
◾रिक्त पदे : 0100 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर).
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या पत्त्यावर दिनांक १२/०४/२०२४ पर्यंत सकाळी ९ ते ५ या वेळेत समक्ष जमा करावे किंवा पोस्टाने पाठवावे. मुलाखतीची वेळ व दिनांक आपणास कळविण्यात येईल.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾लास्ट तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिवा ट्रस्टचे मुख्यालय, तिसरा मजला, सानिया चेंबर्स, सेव्हनहिल्स विमानतळ पुलाजवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.