SSC CGL Bharti 2024 Notification : SSC (कर्मचारी निवड आयोग) विविध मंत्रालये/ विभाग / संस्थेतील गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदांसाठी तसेच पोस्टल सहाय्यक, लेखापाल, लिपिक, सचिवालय सहाय्यक व इतर पदे यांसारख्या पदांसाठी 017,727 रिक्त जागा पूर्ण करण्यासाठी नवीन पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC – स्टाफ सिलेक्शन कमीशन) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, कार्मिक मंत्रालय, आणि प्रशिक्षण विभाग, कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
SSC CGL Bharti 2024 Notification : Online applications are invited from newly eligible and interested candidates to fill up 017,727 vacancies for Group 'B' and Group 'C' posts like Postal Assistant, Accountant, Clerk, Secretarial Assistant and other posts.
◾भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 017,727 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : पोस्टल सहाय्यक, लेखापाल, लिपिक, सचिवालय सहाय्यक व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 32 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾परीक्षा शुल्क :
▪️खुला वर्ग (खुला वर्ग) : ₹ 100/-
▪️आरक्षित श्रेणी (राखीव वर्ग) : कोणतेही अर्ज शुल्क नाही.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾सर्व पदाचे नाव : लेखा परीक्षक, लेखापाल, लेखापाल/ कनिष्ठ लेखापाल, पोस्टल सहाय्यक/ वर्गीकरण सहाय्यक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ उच्च विभाग लिपिक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, सहाय्यक विभाग अधिकारी, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, कार्यकारी सहाय्यक, संशोधन सहाय्यक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक/ कनिष्ठ गुप्तचर अधिकारी, कनिष्ठ सांख्यिकी कार्यालय आणि कर सहाय्यक.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️कनिष्ठ सांख्यिकी कार्यालय : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून 12वी स्तरावर गणितात किमान 60% गुणांसह कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी; किंवा पदवी स्तरावरील विषयांपैकी एक म्हणून सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी.
▪️सांख्यिकी अन्वेषक ग्रेड-II : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील एक विषय म्हणून सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी.
▪️राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) मध्ये संशोधन सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी.
▪️इतर सर्व पोस्ट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष. पदवीच्या अंतिम वर्षात बसलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारता. (All India)
◾उमेदवारांनी त्यांचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव आणि आईचे नाव मॅट्रिकच्या प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे काटेकोरपणे लिहावे अन्यथा त्यांची उमेदवारी कागदपत्र पडताळणीच्या वेळी किंवा आयोग/वापरकर्ता विभागाच्या निदर्शनास आल्यावर रद्द केली जाऊ शकते.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 24 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.