पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
SSC GD 2024 Advertisement : केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission – SSC) व्दारे तब्बल 39,481 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. GD कॉन्स्टेबल ही पदे भरली जात आहेत. तुम्ही पात्र असाल तर नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच 18 ते 23 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध सुरक्षा दलांमध्ये केली जात आहे. यामध्ये BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF, NCB या सुरक्षा दलांमध्ये ही भरती केली जात आहे.
या भरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना 21,700 ते 69,100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. सरकारी व कायमस्वरुपी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. 10 ऑक्टोबर 2024 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी वरील दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.