खूशखबर! दहावीचा निकाल लागला! येथे चेक करा तुमचा निकाल. | SSC Result 2024 Maharashtra

SSC Result 2024 Maharashtra : 10वीची परीक्षा दिली आहे आणि निकालाची वाट पाहत असाल तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. इयत्ता 10वी चा निकाल लागला आहे. शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात आला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर आज सोमवार, दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी 01 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. 10वी चा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SSC Result 2024 Maharashtra : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध झाले आहेत व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) काढून घ्या. 10वी चा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
शिक्षण मंडळाचे
अधिकृत पत्रक
येथे क्लीक करा
निकाल पाहण्यासाठी
वेबसाईट 1
येथे क्लीक करा
निकाल पाहण्यासाठी
वेबसाईट 2
येथे क्लीक करा

खाली दिलेल्या शिक्षण मंडल्याच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच अधिकृत संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

error: Content is protected !!