‘ST महामंडळ’ मध्ये तब्बल 0446 पदांची भरती प्रक्रिया जाहीर! | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, नाशिक विभाग, नाशिक प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, नाशिक विभाग, नाशिक येथे शिकाऊ उमेदवारी सन 2025 – 26 या सत्रामध्ये रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत असुन तांत्रिक व्यवसायिक आयटीआय उत्तीर्ण / व्होकेशनल या व्यवसायामध्ये शिकाऊ उमेदवारांची पदे भरण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज मागवित आहेत. या भरतीसाठी 10वी / पदवीधर / ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

नियम व अटी : शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गाकरिता रु.५००/- अधिक रु.९०/- जी.एस.टी. असे एकुण रु.५९०/-व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता रु. २५०/- अधिक रु.४५/- जी.एस.टी. असे एकुण रु.२९५/- असे राहील व त्यावरील बँकेचे सेवा शुल्कासहित उमेदवाराने सदर शुल्क रा.प. महामंडळाच्या खात्यावर RTGS / NEFT व्दारे भरणा करण्यांत यावा व बँकेकडून UTR No. पावती अर्जासोबत जोडावी. उमेदवारांने भरलेले प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही. शिकाऊ उमेदवाराची निवड त्यांचे आय.टी.आय. उत्तीर्ण, व्होकेशनल अभ्यासक्रम, व्होकेशनल (इ.१२ वी) संबंधित व्यवसायाशी संलग्न विषय कोड क्र. एम-१, एम-२, एम-३ घेवुन उत्तीर्ण व अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक उत्तीर्ण या गुणांनुसार करण्यात येईल. शैक्षणिक पात्रता दिनांक १७.०३.२०२५ रोजी ०३ वर्षापुर्वीची नसावी.

उमेदवाराने रोजगार व स्वयंरोजगार मागर्दशन केंद्र कार्यालय / समाजकल्याण कार्यालय / एकात्मीक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय इ. अधिकृत संस्थेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जासोबत नोंदणी पत्राची झेरॅक्स प्रत जोडण्यात यावी. शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १७.०३.२०२५ अंतिम राहील. उमेदवाराने अपुर्ण भरलेले व मुदतीनंतर आलेले अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo