PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी उपक्रम कार्यप्रशिक्षण उमेदवार निवड करण्यासाठी ही भरती करण्यात येत आहे.
या प्रशिक्षण भरती मध्ये मेळावा प्रभारक, आरेखक (यांत्रिकी), लेखाकार, भांडारपाल कनिष्ठ, संगणित्र चालक, लिपिक टंकलेखक, वीजतंत्री, इमारत निरिक्षक, नळ कारागीर, गवंडी, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, शिपाई ही एकूण 046 पदे भरली जात आहेत. या प्रशिक्षण भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना विद्यावेतन पदवीधर रु.१०,०००/- प्रति महिना, आय.टी.आय. उत्तीर्ण रु. ८,०००/- प्रति महिना, १२ वी पास रु. ६,०००/- प्रति महिना दिले जाणार आहे. पुणे हे प्रशिक्षण ठिकाण असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. कागदपत्रे पडताळणी तारीख: दि.०८/१०/२०२४ ते १६/१०/२०२४ पर्यंत. कागदपत्रे पडताळणी पत्ता: म.रा.मा.प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे-४११०१२. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.