
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
भारत सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये प्रतिष्ठित पदांवर नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत एकत्रित पदवीधर स्तर (CGL) परीक्षा 2025 साठी देशभरातील 14,582 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही पात्र असाल तर आजचं ऑनलाईन अर्ज करा.
या भरती मोहिमेअंतर्गत सहाय्यक विभाग अधिकारी, निरीक्षक (विविध विभाग), सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक (विविध विभाग), कार्यकारी सहाय्यक, संशोधन सहाय्यक, विभागीय लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी कार्यालय, लेखा परीक्षक, लेखापाल, पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च विभाग लिपिक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक आणि कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
देशभरात कुठेही नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. 25,500/- ते रु. 1,42,400/- पर्यंत आकर्षक वेतन/मानधन दिले जाईल. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 32 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्ज शुल्क फक्त रु. 100/- असून, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करायची आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 09 जून 2024 रोजी सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 जुलै 2025 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता त्वरित अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिकृत माहितीसाठी कृपया SSC च्या वेबसाइटला भेट द्या. ही एक अनोखी संधी आहे, तिला गमावू नका!