नवीन : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मध्ये विविध नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरू! | Tadoba Tiger Reserve Bharti 2024

Tadoba Tiger Reserve Bharti 2024 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर, कॉल सेंटर सहाय्यक- व मल्टी परपज स्टाफ (MPT) या रिक्त पदांसाठी नेमणुक करावयाची आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 12वी, पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र वनविभाग, कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Tadoba Tiger Reserve Bharti 2024 : Tadoba-Andhari Tiger Reserve is recruiting for the vacant posts of Accountant, Data Entry Operator, Call Center Assistant and Multi Purpose Staff (MPT). Applications are invited from eligible candidates through online mode.

महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : वनविभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर, MTS (MPS) कॉल सेंटर सहाय्यक व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 12वी / पदवीधर उत्तीर्ण व इतर पात्रता (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 50,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 62 वर्षे.
भरती कालावधी : सर्व पदे ही कंत्राटी स्वरुपाची आहेत.
पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :
▪️कम्युनिकेशन मॅनेजर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / स्रातक व जनसंचार / जाहिरात / जनसंपर्क या क्षेत्रात पदवी / डिप्लोमा.
▪️सीएसआर मॅनेजमेंट ऑफिसर : Business Administration / Social Sciences /Environmental Studies या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
▪️सिव्हिल सर्व्हंट अकाउंटंट : वाणिज्य शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी-40 आणि मराठी-30, MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
▪️डेटा एन्ट्री ऑपरेटर : कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी-40 आणि मराठी-30, MS- CIT संगणक परीक्षा पास (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)
▪️कॉल सेंटर असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवीधर, MS- CIT व तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)
▪️बहुउद्देशीय कर्मचारी : 12 वी उत्तीर्ण (HSC बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक आहे)
एकूण पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन चंद्रपूर.
जाहीरातीत नमुद सर्व पदे ही कंत्राटी स्वरुपाची असुन आवेदन अर्ज करित असतांना प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
उमेदवाराने आपला अर्ज जाहीरातीसोबत दिलेल्या QR Code अथवा लिंकव्दारे उघडणाऱ्या ऑनलाईन पध्दतीनेच करावा. QR Code अथवा लिक संबंधी कोणतीही अडचण असल्यास खालील पत्त्यावर पत्यावर या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करावा.
कंत्राटी पदांकरीता आलेल्या आवेदन अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांनाच मुलाखतीकरीता बोलविण्यात येईल. तसेच मुलाखतीनंतर ठराविक पदांकरीता आवश्यकतेनुसार उमेदवारांची स्किल टेस्ट घेण्यात येईल.
मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही. उमेदवारांना मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ वेगळयाने कळविण्यात येईल.
वैयक्तिक मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांच्या आवेदन अर्जातील नमुद भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडीवरच या कार्यालयाव्दारे संपर्क केल्या जाईल. तसेच या कार्यालयामार्फत संपर्क करतांना उमेदवारांनी त्यांचे भ्रमणध्वनी व ई-मेल आयडीवरुन प्रतिसाद न दिल्यास किंवा मुलाखतीस उमेदवार उपस्थित नसल्यास त्यांना मुलाखतीमध्ये अपात्र ठरविण्यात येईल.
वरिल पदांचे कामे ही पूर्णवेळ असल्याने नियुक्ती कालावधीत उमेदवाराला इतरत्र कुठेही काम/प्रॅक्टीस करता येणार नाही.
वरील सर्व पदाचे मुख्यालय चंद्रपूर असुन निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन, चंद्रपूर यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रामधील इतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
उमेदवार हा कोणत्याही इतर शासकीय, निमशासकिय, अशासकीय संस्था किंवा इतर संघटना यांचा पदाधिकारी असता कामा नये.
आवश्यकतेनुसार जाहिरातीमधील पदे व इतर निर्णयामध्ये बदल करण्याचा अधिकार कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन, चंद्रपूर/निवड समिती यांनी राखून ठेवीत आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांचे कार्यालय, मुल रोड, चंद्रपूर-442401.
अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!