तलाठी भरती 2023 : जाहिरात बद्दल नवीन मोठी अपडेट! Talathi Recruitment 2023

Talathi Bharti 2023 : अनेक दिवसांच्या प्रतिक्षे नंतर तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवगांतील एकुण ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकूण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल. जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पुर्तता करणान्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येणार आहेत. अपडेट व जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Talathi Bharti Recruitment 2023 : Recruitment for various posts in various government and private as well as educational institutions of the state has been announced in all over Maharashtra and in all districts and the recruitment process of eager candidates has started. Also don't miss this great opportunity for job seeker in education department. In this bumper recruitment of 4700 posts, the recruitment of security guard, constable, fireman, cleaning staff, watchman, clerk, all teachers and other posts has started.

◾वयोमर्यादा :-

 • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक १ जानेवारी २०२३.
 • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
 • मागासवगीय उमदेवारांसाठी : किमान १८ वर्षांपेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे. तथापी उन्नत व प्रगत गटांमध्ये क्रिमीलेयर (Creamy Layer) मोडणाज्या वि.जा- अ, भ.ज. ब, भ.ज.क, भ.ज. ड, विमा.प्र, इ.मा.व., एस.ई.बी.सी आणि ई.डब्ल्यु.एस. (आर्थिकदृष्टया दुर्बल घटक) प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही
 • पदवीधारक/पदविकाधारक/अंशकालीन उमेदवारांसाठी : कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील.
 • स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन १९९९ चे जनगणना कर्मचारी व सन १९९४ नंतर निवडणूक कर्मचारी यांचेसाठी : कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील. या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील.
 • दिव्यांग उमेदवारांसाठी : उच्चतम वयोमर्यादा सरसकट ४५ वर्ष इतकी राहील. तथापि, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचे किमान दिव्यंगत्वाचे प्रमाण ४० टक्के असल्याबाबतचे स्थायी वैद्यकिय मंडळाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच त्यांची निवड झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमीत करण्यापूर्वी शासनाने नियुक्त केलेल्या तज्ञ वैद्यकीय मंडळाने तो उमेदवार संबंधित पदावर काम करु शकेल असे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची अंतिम नियुक्ती केली जाईल. सदर प्रमाणपत्रावर उमेदवाराचा फोटो असणे आवश्यक आहे.
 • प्रकल्पग्रस्त आणि उमेदवारांसाठी : कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील. सदर वयोमर्यादा सरसकट शिथील केली असल्याने, मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्त उमेदवारांनाही कमाल वयोमर्यादेबाबत ४५ वर्षापर्यतची सवलत राहील.
 • माजी सैनिक उमेदवारांसाठी : माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. तसेच, अपंग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षेपर्यंत राहील.
 • दि. ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी प्रसिध्द होणान्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.
जाहिरात महत्वाच्या लिंक
जिल्हानिहाय पदेयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज 1 येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज 2येथे क्लीक करा

◾पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :-

 • पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी / वाढ) होण्याची शक्यता आहे.
 • पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
 • प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. तथापि, जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरीता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल (कमी / वाढ होण्याची शक्यता आहे.
 • महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणान्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे.
 • विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
 • कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसामान्य रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसामान्य रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधत्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.
 • कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
 • सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्य कार्यवाही करण्यात येईल.

◾खेळाडू आरक्षण :-

 • शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
 • प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणान्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.
 • खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो. या विज्ञयीच्या पडताळीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी आरक्षणाकरीता पात्र समजण्यात येणार नाही.
 • एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
 • परीक्षेकरीता अर्ज सादर करतांना खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकारी याने प्रमाणित केलेले प्राविण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, याविषयीचा सक्षम प्राधिकान्याने प्रदान केलेले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारस / नियुक्तीकरीता विचार करण्यात येईल.

◾दिव्यांग आरक्षण:-

 • शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील.
 • दिव्यांग व्यक्तींची संबंधित संवर्ग / पदाकरीता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.
 • दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे. याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल.
 • संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकारचे किमान ४० % दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार / व्यक्ती आरक्षण अनुज्ञेय सोयी सवलतीसाठी पात्र असतील. लक्षणीय दिव्यंगत्व असलेले उमेदवार / व्यक्ती खालील सवलतीच्या दाव्यास पात्र असतील. दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४० % अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असल्यास नियमानुसार अनुज्ञेय आरक्षण व इतर सोयी सवलती.
 • दिव्यांगत्वाचे प्रमाण किमाण ४० % अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद संबंधित दिव्यांग प्रकारासाठी सुनिश्चित केले असल्यास नियमानुसार अनुज्ञेय सोयी-सवलती. दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणान्या उमेदवारांनी शासन निर्णय केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

◾अनाथ आरक्षण :

 • अनाथ प्रवर्गासाठी दावा दाखल करणाऱ्या उमेदवाराने अर्ज सादर करतेवेळी महिला व बाल विकास विभागाकडील सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अन्य यंत्रणेकडून वितरीत करण्यात आलेले प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही.
 • अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन शासन सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवाराला अनाथ प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल. नियुक्ती पश्चात ६ महिन्याच्या कालावधीत आयुक्त, महिला व बालविकास पुणे यांचेकडून अनाथ प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकारी / विभाग प्रमुख यांची राहील.
 • अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा करण्यात येईल.

◾माजी सैनिक आरक्षण :-

 • उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्याने त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यास माजी सैनिकांचा अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत.
 • माजी सैनिकांकरीता आरक्षणासंदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार असतील.

◾ परीक्षा शुल्क :

अ.क्र. पदाचे नाव खुला प्रवर्ग राखीव प्रवर्ग
1तलाठी
(पेसा क्षेत्राबाहेरील)
1000 रूपये900 रूपये
2तलाठी
(पेसा क्षेत्रातील)
1000 रूपये900 रूपये

◾महत्वाची सूचना

 • सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावरुन एकत्रितरित्या राबविली जात असली तरी, सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या त्या जिल्हयात भरावयाच्या पदांचा विचार करून, प्रत्येक जिल्हयाची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक जिल्हयाची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्हयाकरीताच विचारार्थ घेतले जातील व त्याचा अन्य जिल्हयातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. तलाठी संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकारी हे संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी असतील, परंतू निवड झालेल्या उमेदवारास उपविभाग नेमूण देण्याचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना असतील.

◾तलाठी (पेसा क्षेत्रातील) पदांसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :-

 • पेसा (PESA) क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील तलाठी पदे होय.
 • सदर पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यात येतील.
 • स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार याचा अर्थ “जे अनुसूचित जमातीचे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे आई- वडील किंवा आजी- आजोबा संबंधित जिल्हयाच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये दि. २६ जानेवारी १९५० पासून सातत्याने वास्तव्य करीत आहेत” असा होय.
 • अनुसूचित जमातीचे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा संबंधित जिल्हयाच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये दि. २६ जानेवारी १९५० पासून सातत्याने वास्तव्य करीत आहेत. असे उमेदवार तलाठी (पेसा क्षेत्रातील) पदासाठी अर्ज करू शकतील.
 • अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य संवर्गाची पदे ही स्वतंत्रपणे दर्शविण्यात आलेली नसून परिशिष्ट १ मध्ये सामाजिक व समांतर आरक्षणात एकत्रित दर्शविण्यात आलेली आहे.

◾विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे अपलोड करणे :-

 • प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
 • विविध सामाजकि व समांतर आरक्षणचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे.

◾सर्वसाधारण सूचना :-

 • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
 • अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ :- https://mahabhumi.gov.in
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahabhumi.gov.in तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच अधिकृत या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

◾जिल्हा केंद्र निवड :-

 • प्रस्तृत परीक्षेकरीता विविध जिल्हा (परीक्षा) केंद्राचा तपशील https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या-परीक्षी योजना / पध्दती या सदरामध्ये उपलब्ध आहे.
 • अर्ज सादर करतानाचा जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
 • जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
 • जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अजांमध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवासाच्या पत्याचे आधारे संबंधित महसूली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल. याबाबत शासनाचे त्या त्या वेळचे धोरण व निर्णय अंतिम मानन्यात येईल.

◾प्रतिक्षा यादी :

जाहिरातीत नमूद तलाठी संवर्गातील पदांची प्रतिक्षासूचीसह निवडसूची सर्व प्रकारची परीक्षा होऊन अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून एक वर्ष कालावधीकरीता किंवा पुढील निवडप्रक्रियेची कार्यवाही सुरु होण्याचा दिनांक, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत विधीग्राहय राहील. तद्नंतर सदर प्रतिक्षासूचीसह निवडसूची व्यपगत होईल. तथापि, भरती प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने भरती प्रक्रिया, निवडसूची, प्रतिज्ञासूची इत्यादीचे अनुषंगाने दिलेले निर्देश तथा सुचना किंवा सुधारणा यथास्थितीत लागू राहतील.

◾सेवाप्रवेशोत्तर शती :

 • नियुक्त झालेल्या व्यक्तोस खालील अहंता / परीक्षा विहीत वेळेत व विहीत संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
 • जेथे प्रचलित नियमानुसार विभागीय परीक्षा विहित केली असेल अथवा आवश्यक असेल तेथे त्यासंबंधी केलेल्या नियमानुसार विभागीय व्यावसायिक परीक्षा,
 • हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार जर तो व्यक्ती आगोदर परीक्षा उत्तीर्ण झाली नसेल होण्यापासून सूट मिळालेली नसेल तर ती परीक्षा किंवा तिला उत्तीर्ण महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणी बाबतची प्रमाणपत्र परीक्षा.

◾प्रवेश प्रमाणपत्र :

 • परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे शासनाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर https://mahabhumi.gov.in परीक्षेपूर्वी डाऊनलोड उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे ७ दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याची प्रत करुन घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
 • परीक्षेच्यावेळी उमेदवाराने स्वतः चे प्रवेशप्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय, परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
 • प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या अजात नमूद नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल. याबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी एक अठवडा आगोदर प्रसिध्द करण्यात येईल.
 • परीक्षेच्या दिनांकापूर्वी ३ दिवस अगोदर प्रवेशप्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाच्या / जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदत कक्षाकडे संपर्क साधावा.
 • परीक्षेच्यावेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोटू, पॅनकार्ड, किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स, यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
 • आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले ई- आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधार वर उमेदवारांचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhar Generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई- आधार वैध मानण्यात येईल.
 • नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहित स्त्रिया यांच्या बाबतीत) नावांत बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखल व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे.
 • अधिक माहितीसाठी https://mahabhumi.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
error: Content is protected !!