PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (मोबाईल मधून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ब्राऊझरची डेस्कटॉप सेटिंग करून मोबाईल आडवा करा.) |
जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्र मधील रिक्त पदे भरण्यासाठी सुद्धा भरती होत आहे. तमिलनाडु मर्केंटाइल बैंक लिमिटेड (टीएमबी) बँक अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरात मध्ये दिलेल्या माहितीनुसार देशातील विविध राज्यात रिक्त असलेली पदे भरती जात आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य सुद्धा आहे. वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी ही पदे भरली जात आहेत. एकूण 170 पदे (महाराष्ट्रात ३८ पदे) भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 32,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
तुमचे शिक्षण पदव्युत्तर असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहात. तुमचे वय 26 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत आणि त्यांनी पोस्टसाठी सर्व पात्रता निकषांची पूर्तता केली असल्याचे सुनिश्चित केले पाहिजे. TMB उमेदवारांना ऑन-लाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आणि लागू आवश्यक शुल्कासह प्रवेश देईल आणि मुलाखतीच्या / सामील होण्याच्या टप्प्यावर त्यांची पात्रता सत्यापित करेल.
कोणत्याही टप्प्यावर, ऑन-लाइन अर्जामध्ये दिलेली कोणतीही माहिती खोटी / चुकीची असल्याचे आढळून आल्यास किंवा बँकेच्या मते, उमेदवाराने या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले नाहीत तर, त्याची उमेदवारी रद्द केली जाईल आणि त्याला /तिला मुलाखतीसाठी / जॉईनिंगसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 06 नोव्हेंबर 2024 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 नोव्हेंबर 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.