अधिकृत पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
जे उमेदवार ठाणे येथे काम शोधत असतील त्यांना चांगली संधी आहे. ठाणे महानगरपालिका अंतर्गत नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक ही एकूण 042 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही पात्र आणि उस्तुक असाल तर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करू शकणार आहेत.
जाहिरातीमधील पदसंख्या, आरक्षण यामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यानुसार यामध्ये वाढ/कमी करण्याचे अधिकार, तसेच विहित केलेला थेट मुलाखतीचा दिनांक व वेळ, ठिकाण इत्यादीमध्ये कोणत्याही टप्यावर, कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांना राहतील. सदर जाहिरात ठाणे महानगरपालिका नोटीस बोर्ड आणि http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, सदरहू भरती प्रक्रिये संदर्भात अधिक माहिती सदरहू संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
गुगल फार्मचा अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफयात बंद करून सादर करावे. सदर लिफाफयावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव, अर्जदाराचे नाव व पदाचे नाव नमूद करावे. महानगरपालिकेचे नाव नमूद न केलेले अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही. सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकते नुसार बदल करण्याचे वा सदर पदभरती अंशतः किंवा पूर्ण रद्द करण्याचे अधिकार अध्यक्ष, निवड समितीने राखून ठेवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.