महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती विभाग भरती 2025 | UMED MSRLM Bharti 2025

UMED MSRLM Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, अंतर्गत तालुक्यात तालुकास्तरावर व्यक्तीची निवड करावयाची असल्याने पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
UMED MSRLM Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for selection of persons at the taluka level under Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM), District Rural Development Mechanism, Zilla Parishad.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 20,000/- रुपये. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : ४३ वर्ष.
भरती कालावधी : भरतीसाठी निश्चित कालावधी म्हणजेच कामकाजाचा कालावधी (Contract Duration) संदर्भात जाहिरातीत स्पष्ट उल्लेख नाही.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️IFC Block Anchor (IFC ब्लॉक अँकर) :
1) कृषी, फलोत्पादन, मत्स्यपालन, वनशास्त्र, पशुवैद्यक, अ‍ॅनिमल हजबंड्री, व्यवसाय प्रशासन इत्यादी क्षेत्रातील पदवीधर (Graduate) उमेदवार पात्र आहेत.
2) अनुवभ : संबंधित कृषी आधारित क्षेत्रात किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
3) संगणक ज्ञान, संवादकौशल्य असणे.
▪️Senior CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती) :
1) किमान १२वी उत्तीर्ण (HSC pass) असणे आवश्यक आहे.
2) अनुभव : उमेद/NRLM अंतर्गत किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
3) स्थानिक गावातील/तालुक्यातील रहिवासी असणे.
एकूण पदे : 016 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : जळगाव.
◾ज्या तालुक्यासाठी भरती आहे, तेथीलच उमेदवार प्राधान्याने विचारात घेतले जातील.
◾दर महिन्याला कामगिरीचे मूल्यांकन होईल. काम समाधानकारक न वाटल्यास नियुक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केली जाऊ शकते.
◾संबंधित तालुक्यातील गावे आणि त्याचे IFC क्लस्टर्स. काम ग्रामीण स्तरावर असणार आहे.
◾प्रवास भत्ता मानधनात समाविष्ट असून वेगळा दिला जाणार नाही.
लेखी परीक्षा व मुलाखत : निवड प्रक्रिया लेखी परीक्षा (40 गुण) व तोंडी मुलाखत (10 गुण) यावर आधारित आहे.
◾अर्जात खोटी माहिती दिल्यास उमेदवाराची नियुक्ती तत्काळ रद्द करण्यात येईल.
◾सर्व बाबतीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा निर्णय अंतिम राहील. कोणतीही न्यायालयीन वाद जिल्हा जळगाव न्यायाधिकारात येईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : ०९/०५/२०२५ रोजी सायं. ०५.०० वाजेपर्यंत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव तथा जिल्हा अभियान सहसंचालक, उमेद एमएसआरएलएम, जळगाव कार्यालय, ला. ना. शाळेजवळ, जी. एस. ग्राउंड शेजारी, जळगाव, ४२५००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!