महाराष्ट्र वनविभाग : ‘वनसेवक’ या पदांसाठी 12,991 जागांची भरती अपडेट! | Vansevak / Vanmajur Bharti 2025

Vansevak  Bharti 2025 / Vanmajur Bharti 2025 : वन मजूर हे वन विभागातील महत्त्वाचा घटक आहेत. परंतु, काळानुसार निवृत्त झाल्यामुळे वनमजुरांची संख्या कमी झाली असून, राज्यात 12,991 वनसेवक भरती करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात वनविभागाचे पत्रक समोर आले आहे. जंगलात बीट गार्ड सोबत फिरणारे वन मजूर हा वन विभागातील महत्त्वाचा घटक आहे. परंतु निवृत्त झाल्यामुळे वन विभागात वनमजुरांची संख्या कमी झाली आहे. तात्पुरत्या स्वरुपात कामावर घेतलेल्या वन मजुरांच्या मदतीने काम पाहण्यात येत आहे. त्यामुळे वन विभागात 12,991 ‘वनसेवक’ पदांची भरती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. वनविभागाचे 12,991 वनसेवक भरती संदर्भात PDF पत्रक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती प्रकार : सदर संवर्ग हा १००% सरळसेवेने भरण्यात येईल.
◾पदाचे नाव : सदर पदाचे पदनाम ‘वनसेवक’ असे राहील.
◾ शैक्षणिक पात्रता : सदर पदावर नियुक्तीकरीता किमान १० वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल. तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही १२ वी असावी.
◾यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल. स्थानिक याचा अर्थ ज्या वनविभागात नियुक्ती द्यावयाची आहे त्या वनविभागातील (Division) रहिवासी असा राहील.
◾सदर पद गट-ड मधील राहील व त्याची सातव्या वेतन आयोगात वेतनश्रेणी एस- १ (रु. १५००० – ४७६००) अशी राहील.
◾वनरक्षक (गट-क) मधील २५% पदे ही वनसेवकांमधून पदोन्नतीने भरण्यात येतील.
◾ ही माहिती अपूर्ण असू शकते. खाली दिलेले वनविभागाचे pdf पत्रक पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
महाराष्ट्र वनविभाग यांचे वनसेवक भरती 2024 – 25
संदर्भातील पत्रक
येथे क्लीक करा

वनसेवकांच्या प्रस्तावित कर्तव्य व जबाबदा-या : Vansevak  Bharti 2025 / Vanmajur Bharti 2025 :
१) नियतक्षेत्र वनसेवक (वनरक्षकाचे मदतनीस) प्रत्येक नियतक्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्यक म्हणून काम करणे. यामध्ये नियतक्षेत्रात गस्त करुन वनाचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वनगुन्हा नोंदविणेसाठी सहाय्य करणे / तपासात सहाय्य करणे, प्रलचित नियमाप्रमाणे वनक्षेत्राच्या सिमांची देखभाल करणे, वन वनव्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामे, JMFC / VEDC इत्यादीसंदर्भात कामे, कार्य आयोजनेचे अनुषंगाने कामे, मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळणेसाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी सहाय्य करणे, Rescue Operation ची कामात सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे. याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.
२) परिमंडळ वनसेवक (क्षेत्र सहाय्यकाचे मदतनीस): प्रत्येक परिमंडळासाठी क्षेत्र सहाय्यकास सहाय्यक म्हणून काम करणे. यामध्ये परिमंडळात गस्त करुन वनाचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वनगुन्हा नोंदविणेसाठी सहाय्य करणे / तपासात सहाय्य करणे, प्रलचित नियमाप्रमाणे वनक्षेत्राच्या सिमांची देखभाल करणे, वन वनव्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामे.
३) वन परिक्षेत्र कार्यालयीन मदतनीस वन परिक्षेत्र कार्यालयात शासनाच्या विविध योजना व संरक्षण संवर्धनाशी निगडीत विविध कार्यालयीन कामे पार पाडण्यासाठी सहाय्यक म्हणून काम करणे. याशिवाय वन परिक्षेत्र अधिका- यासोबत गस्त करणे तसेच अतिक्रमण काढण्याच्या घटना, सॉमिल तपासणी, मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना व त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था राखणे याकामी वन परिक्षेत्र अधिका-यांना सहाय्यक म्हणून काम करणे. तसेच वनसेवकास वन परिक्षेत्र अधिका-यानी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.
४) शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी मदतनीस वनविभागाचे प्रत्येक शासकीय कार्यालय / कार्यशाळा / आगार / वनविश्रामगृहे / वनोज्ञान / जिल्हास्तरीय व उच्च पदस्थ अधिका-याचे निवासस्थान ही शासकीय मालमत्ता असल्याने त्याची देखरेख व इतर कामे करणे.
५) तपासणी नाका मदतनीस तपासणी नाक्यावर सहाय्यक म्हणून काम करणे.
६) एकीकृत रोपवाटीका (Integrated Nursery) मजूर: रोपवाटीका मजूर म्हणून काम करणे. यामध्ये रोपवाटीकेची संपूर्ण देखरेख करणे, साफसफाई करणे, पाणी देणे, बियाणे गोळा करणे, रोपवाटिकेच्या कुंपणाची किरकोळ दुरुस्तीची कामे करणे इत्यादी कामांचा समावेश राहील. याशिवाय वरिष्ठांनी रोपवाटीकेसंदर्भात वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.
७) इतर :- वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली इतर शासकीय कामे.
◾ही माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले वनविभागाचे पत्रक पहा.


error: Content is protected !!