वनरक्षक भरती 2024 : सर्व निवड व प्रतिक्षा याद्या येथे उपलब्ध! Vanrakshak Bharti 2024 Selection List

वनरक्षक भरती 2023 – 2024 :  राज्यात 2023 मध्ये जाहीर झालेल्या वनरक्षक भरतीत अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यानंतर लेखी परीक्षा व मैदानी चाचणी नंतर वनरक्षक भरतीतील उमेदवारांचे गुणांची गुणवत्ता आणि सामाजिक /समांतर आरक्षण विचारात घेवून, यासोबत निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येवून प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे. वनरक्षक भरती 2023 – 24 ची निवड यादी व प्रतिक्षा यादी लागण्यास सुरुवात झाली आहे. सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या व प्रतिक्षा याद्या खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vanrakshak Bharti 2024 : महाराष्ट्र वनविभागा (Maharashtra Forest Department) ने जाहीर केलेल्या या भरतीमध्ये 2177 वनरक्षक पदांची भरती केली जात आहे. सर्व निवड व प्रतिक्षा याद्या खाली दिल्या आहेत.
वनरक्षक भरती 2024 :
सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या
(सिलेक्शन लिस्ट) पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

वनरक्षक हे वनविभागातील आघाडीचे पद असून त्यांना वनक्षेत्रात पायी गस्त करावी लागते. त्यामुळे वनरक्षक हे शारीरीकदृष्टया सदृढ असणे आवश्यक आहे. वरती दिलेल्या निवड यादीतील वनरक्षक पदासाठी पुरुष उमेदवारांना २५ कि.मी. व महिला उमेदवारांना १६ कि.मी. चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी विहित करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने, खाली दिलेल्या निवडसूचीतील (निवड यादी व प्रतीक्षा यादी) पुरूष उमेदवारांकरिता चार तासामध्ये २५ कि.मी. अंतर चालणे व महिला उमेदवारांकरीता चार तासांमध्ये १६ कि.मी. अंतर चालणे अशी चालण्याची शारीरिक तग धरण्याची चाचणी (Stamina test) घेण्यात येते. शारीरिक क्षमता चाचणीव्दारे पुरूष उमेदवारांना २५ कि.मी. व महिला उमेदवारांना १६ कि.मी. अंतर उमेदवारांनी चालून किंवा धावून किंवा चालून व धावून जास्तीत जास्त ४ तासात पूर्ण करणे आवश्यक आहे. जे उमेदवार सदर चालचाचणी ४ तासांच्या आत पूर्ण करू शकणार नाहीत, ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.

error: Content is protected !!